Advertisement

'या' कारणामुळे बेस्टने नाकारली ज्येष्ठांना बस सवलत

ज्येष्ठ नागरिकांना बस तिकीट दरात सवलत देण्यास आता बेस्ट प्रशासनाने नकार दिला आहे. ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात बस प्रवास देण्याचा मुंबई पालिका प्रशासनाचा प्रस्ताव बेस्टने मान्य केला नाही.

'या' कारणामुळे बेस्टने नाकारली ज्येष्ठांना बस सवलत
SHARES

ज्येष्ठ नागरिकांना बस तिकीट दरात सवलत देण्यास आता बेस्ट प्रशासनाने नकार दिला आहे. ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात बस प्रवास देण्याचा मुंबई पालिका प्रशासनाचा प्रस्ताव बेस्टने मान्य केला नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या बस प्रवासापासून वंचित रहावं लागणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांना बस तिकीटात सवलत न देण्यामागे तिकीट दर कमी झाल्याचे कारण बेस्ट प्रशासनाने दिलं आहे. ज्येष्ठ नागरिकांना अर्ध्या किमतीत प्रवास दिला जावा असा प्रस्ताव पालिकेच्या नियोजन विभागाने बेस्ट प्रशासनाला दिला होता. योजन विभागाकडून यासाठी निधी मंजूर केला जाणार होता. हा प्रस्ताव पालिकेने अभिप्रायासाठी बेस्ट प्रशासनाकडे दिला होता. मात्र बेस्ट प्रशासनाने जुलै महिन्यापासून प्रवास भाडे कमी झाल्याचे कारण पुढे करत हा प्रस्ताव नाकारला आहे. 

रेल्वे, एसटी, एनएमएमटीकडून ज्येष्ठांना प्रवास भाड्यात सवलत दिली जाते. त्यामुळे बेस्टनेही सवलत द्यावी अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांकडून अनेक महिन्यांपासून केली जात होती. मात्र, बेस्टने ही सवलत नाकारली आहे.  या सवलतीसाठी पालिकेकडून निधी उपलब्ध केला जाणार होता. त्याचा आर्थिक भार बेस्टवर पडणार नव्हता. तरीही हा प्रस्ताव नाकारला गेल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.



हेही वाचा -

RTI च्या कक्षेत आता सरन्यायाधिशांचे कार्यालयही

चुनाभट्टी-बीकेसी उड्डाणपुलावर रिक्षा बंदीमागचं 'हे' आहे कारण




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा