Advertisement

चुनाभट्टी-बीकेसी उड्डाणपुलावर रिक्षा बंदीमागचं 'हे' आहे कारण

चुनाभट्टी ते बीकेसी या नव्या उड्डाणपुलावर रिक्षा आणि मोटरसायकलला बंदी घालण्यात आली आहे.

चुनाभट्टी-बीकेसी उड्डाणपुलावर रिक्षा बंदीमागचं 'हे' आहे कारण
SHARES
चुनाभट्टी ते बीकेसी या नव्या उड्डाणपुलावर रिक्षा आणि मोटरसायकलला बंदी घालण्यात आली आहे.  भविष्यात वाहतुकीची वाढती वर्दळ लक्षात घेऊन पुलावर अपघात घडू नयेत म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.  

चुनाभट्टी ते बीकेसी या नवीन पुलामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावरून अवघ्या काही मिनिटांत बीकेसीत प्रवेश करता येणार आहे. त्यामुळे चेंबूर-सांताक्रूझ लिंक रोड आणि सायन-धारावी मार्गावरील वाहतूक या पुलाकडे वळली आहे. सांताक्रूझ लिंक रोड आणि सायन-धारावी मार्गाद्वारे बीकेसीत जाता येते. सायन धारावी हा मार्ग लिंक रोडच्या तुलनेत कमी वर्दळीचा आहे. लिंक रोडवर मात्र मोठी वर्दळ असते. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होऊन बीकेसत पोहोचण्यासाठी खूपच वेळ लागतो. नव्या उड्डाणपुलामुळे बीकेसीत जाणं सोपं होणार आहे. 

बीकेसीतील नव्या पुलावर अपघात घडू नयेत म्हणून रिक्षा आणि मोटरसायकलला या पुलावर बंदी घालण्यात आली आहे. जे. जे. उड्डाणपुलावर सुरुवातीला मोटरसायकलना परवानगी होती. बेशिस्त व अतिवेगाने जाणाऱ्या मोटरसायकलस्वारांमुळे सातत्याने अपघात घडत होते. त्यामुळे मोटरसायकलवर बंदी घालण्यात आली. असा प्रकार बीकेसीतील नव्या पुलावर होऊ नये म्हणून आधीच बंदीची पावली उचलली गेली आहेत. हेही वाचा - 
Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा