Advertisement

न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ


न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ
SHARES

न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांनी देशाचे ४७वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. सरन्यायाधीश रंजन गोगोई रविवारी सेवानिवृत्त झाले. न्या. रंजन गोगोई यांचा कार्यकाळ रविवारी संपुष्टात आल्यानं सोमवारी सकाळी ९.३० वाजता न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांनी शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बोबडे यांना पदाची शपथ दिली. बोबडे यांच्या रुपानं मराठी माणूस देशातील न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्चपदी विराजमान झाला आहे.

१७ महिन्यांची कारकीर्द

मराठमोळे न्यायमूर्ती शरद बोबडे यांची कारकीर्द १७ महिन्यांची असणार असून, ते सरन्यायाधीश पदावरून २३ एप्रिल २०२१ या दिवशी निवृत्त होतील. मागील २ वर्षांच्या काळात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या २ महत्त्वाच्या निकालामध्ये न्यायमूर्ती बोबडे यांचा सहभाग होता. अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या अयोध्येतील वादग्रस्त जागेचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या ५ सदस्यीय घटनापीठानं दिला. या घटनापीठाचे न्यायमूर्ती बोबडे हे सदस्य होते. त्याचबरोबर आधार ओळखपत्र आणि गोपनियतेच्या अधिकारासंदर्भात न्यायालयाच्या ३ सदस्यीय खंडपीठानं निकाल दिला. या खंडपीठात न्या. बोबडे यांचाही समावेश होता.

रविवारी सेवानिवृत्त

सरन्यायाधीश रंजन गोगोई रविवारी सेवानिवृत्त झाले. सरन्यायाधीशपदी त्यांची निवड सेवाज्येष्ठतेनुसार झाली आहे. दरम्यान, न्याय संस्थेतील सर्वोच्च पदावर विराजमान होणारे न्यायमूर्ती शरद बोबडे हे चौथे महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत. त्यांच्यापूर्वी न्यायमूर्ती प्रल्हाद गजेंद्रगडकर, न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्लाह, न्यायमूर्ती वाय. व्ही. चंद्रचुड यांनी सरन्यायाधीशपदी काम केलं आहे.


‘एल.एल.बी.’ पदवी

न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे हे मूळचे नागपूरचे असून, त्यांचा जन्म २४ एप्रिल १९५६ रोजी झाला. बोबडे यांचे वडील अरविंद बोबडे हे सुद्धा ज्येष्ठ विधिज्ञ आणि महाराष्ट्राचे महाधिवक्ता होते. न्या. शरद बोबडे यांचे शालेय शिक्षण नागपुरामध्ये झाले. त्यानंतर त्यांनी १९७८ साली नागपूर विद्यापीठाशी संलग्नित डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधि महाविद्यालयातून ‘एल.एल.बी.’ची पदवी घेतली. त्यानंतर नागपूर खंडपीठात वकिलीला सुरूवात केली.



हेही वाचा -

लोकलनं प्रवास करणाऱ्या मुंबईकरांमध्ये 'याची' प्रचंड वाढ

हेल्पफूल 'अल्पो'प्रहार



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा