Advertisement

अपमानित करण्यासाठी जागा बदलली? राऊतांचं थेट उपराष्ट्रपतींना पत्र

शिवसेना खासदारांना अपमानित करण्यासाठीच जागा बदलण्यात आली का? असा प्रश्न विचारणारं पत्र शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी थेट राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांना पाठवलं आहे.

अपमानित करण्यासाठी जागा बदलली? राऊतांचं थेट उपराष्ट्रपतींना पत्र
SHARES

‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’ (एनडीए) तून बाहेर पडलेल्या शिवसेना खासदारांची जागा बदलण्यात आली होती. यावर आक्षेप घेत शिवसेना खासदारांना अपमानित करण्यासाठीच जागा बदलण्यात आली का? असा प्रश्न विचारणारं पत्र शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी थेट राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांना पाठवलं आहे.

महाराष्ट्रात सरकार स्थापनेवरून टोकाचे मतभेद झाल्याने शिवसेना- भाजपच्या ३० वर्षे जुन्या युतीला सुरूंग लागला. भाजप सरकारमध्ये अवजड उद्योग मंत्रालयाचा कारभार सांभाळणारे शिवसेना नेते अरविंद सावंत यांनीही लागलीच आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला.  

हेही वाचा- बाळासाहेबच NDA चे संस्थापक होते, राऊतांनी भाजपला सुनावलं

यानंतर संसदेच्या हिवाळी सत्राच्या पहिल्याच दिवशी संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी ‘एनडीए’तून बाहेर पडलेल्या शिवसेना खासदारांची आसनव्यवस्था विरोधी बाकांवर करण्यात आल्याची माहिती दिली. राज्यसभेतील जागा अचानक बदलण्यात आल्याने संजय राऊत यांनी आश्चर्य व्यक्त केलं. याआधी राज्यसभेत राऊत तिसऱ्या रांगेतील आसनक्रमांक ३८ वर बसत होते. मात्र आता त्यांची पाचव्या रांगेतील आसनव्यवस्था १९९ वर करण्यात आली आहे.


हेही वाचा- 
अखेर 'एनडीए'तून शिवसेना बाहेर, भाजपकडून शिक्कामोर्तब

शिवसेना ‘एनडीए’तून बाहेर पडल्याची अधिकृत घोषणा अद्याप  झालेली नाही. असं असताना राज्यसभेत शिवसेना सदस्यांच्या आसनव्यवस्थेत बदल करण्याचा जो निर्णय घेण्यात आला आहे, त्यात नक्कीच काहीतरी काळंबेरं आहे. राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे आणि या सभागृहाच्या प्रतिष्ठेवर आघात करणारी ही बाब आहे, असं राऊत यांनी पत्रात म्हटलं आहे.

आपल्याला पुन्हा एकदा सन्मानाने पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या रांगेत आसनस्थ होण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंतीही सभापतींकडे केली आहे. सभापती राऊत यांची मागणी मान्य करतील काय? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.  



हेही वाचा-

सत्तास्थापनेबाबत गुरूवारी चित्र स्पष्ट होईल - संजय राऊत

आरेतील वृक्षतोडीवरून पर्यावरणमंत्र्यांना शिवसेनेचा सवाल



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा