आरेतील वृक्षतोडीवरून पर्यावरणमंत्र्यांना शिवसेनेचा सवाल

खासदार अरविंद सावंत यांना बोलण्याची संधी मिळताच त्यांनी मुंबईतील आरेतील वृक्ष कत्तलीचा मुद्दाही उपस्थित केला.

SHARE

संसदेच्या सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनात ‘एनडीए’तून बाहेर पडलेल्या शिवसेनेकडून एकेकाळचा मित्रपक्ष असलेल्या भाजपवर जोरदार हल्ले करण्यात येत आहेत. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी आरेतील कत्तलीवरून भाजपवर लोकसभेत निशाणा साधला.

राजधानी दिल्ली प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेली असताना प्रदूषणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी लोकसभेत अवघे १८ टक्के खासदार उपस्थित होते. चर्चेत सहभागी खासदारांनी मुद्दे मांडताना एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. 


त्यात खासदार अरविंद सावंत यांना बोलण्याची संधी मिळताच त्यांनी मुंबईतील आरेतील वृक्ष कत्तलीचा मुद्दाही उपस्थित केला. ते म्हणाले. एकाबाजूला मुंबईत एका रात्रीत २७०० झाडांची कत्तल करण्यात आली आणि आपण प्रदूषण तसंच वातावरण बदलावर चर्चा करतोय. आधुनिक युगात बॅटरीच्या गाड्या बाजारात येत आहेत. पण आपण इलेक्ट्राॅनिक कचऱ्याचा कधी विचार केला आहे का? हा कचरा कुठे फेकण्यात येईल? याबाबत सरकारचं काही नियोजन आहे का? असा प्रश्न त्यांनी पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांना प्रश्न विचारला. 

महत्त्वाचं म्हणजे आमचं सरकार आल्यावर आरेतील वृक्षांची कत्तल करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन शिवसेनेनं दिलं होतं. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार आल्यास खरंच कारवाई करण्यात येईल का? की हा प्रश्न अनुत्तरीत राहील, हे लवकरच कळेल.हेही वाचा-

'आरेचा शाप' देवेंद्र फडणवीसांना भोवला, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

आरेतील झाडांच्या कत्तलीला स्थगिती, बांधकामाला नाही- सर्वोच्च न्यायालयसंबंधित विषय
ताज्या बातम्या