Advertisement

सत्तास्थापनेबाबत गुरूवारी चित्र स्पष्ट होईल - संजय राऊत

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीवरही त्यांनी भाष्य केले. पंतप्रधानांना एखादा नेता भेटला तर काहीतरी 'काळंबेरं' आहे असे समजण्याचे कारण नाही

सत्तास्थापनेबाबत गुरूवारी चित्र स्पष्ट होईल - संजय राऊत
SHARES

महाराष्ट्रात सत्तास्थापनेता तिढ्याबाबतचे चित्र उद्या स्पष्ठ होईल, महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. बुधवारी राऊत यांनी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली. त्यावेळी राऊत यांनी पवार आणि मोदींच्या भेटीबाबत काहीतरी 'काळंबेरं' आहे असे समजण्याचे कारण नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रात सत्तास्थापनेबाबत राष्ट्रवादी-काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊ पाहत असताना, अद्याप त्यांचे एकमत झालेले नाही. त्यामुळे सत्तास्थापनेचा गुंता अद्याप ही तसाच आहे. दरम्यान बुधवारी दिल्लीत शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत, सत्तास्थापनेबाबत योग्य पद्धतीने चर्चा सुरू असून उद्या (गुरुवार)पर्यंत चित्र स्पष्ट होईल. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सरकार स्थापन होईल, असा विश्वास शिवसेना नेते तथा राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीवरही त्यांनी भाष्य केले. पंतप्रधानांना एखादा नेता भेटला तर काहीतरी 'काळंबेरं' आहे असे समजण्याचे कारण नाही असे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखालीच राज्यात सरकार स्थापन होईल, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा