Advertisement

‘युतीया’ बनवायचं बंद करा, सरकार स्थापनेवरून मनसेचा टोला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष अमेय खोपकर यांनी या गोंधळावर नाराजी व्यक्त करत अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

‘युतीया’ बनवायचं बंद करा, सरकार स्थापनेवरून मनसेचा टोला
SHARES

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून जवळपास महिना होत आला, तरी कुठल्याही पक्षाचं सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. एका बाजूला भाजपने सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेतून काढता पाय घेतला आहे. तर दुसऱ्या बाजूला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दिवसागणिक होणाऱ्या खलबतांतूनही हाती काहीच लागलेलं नाही. यामुळे संतापलेले नेटीझन्स सर्वच राजकीय पक्षांवर मिम्सचा भडीमार करत आहेत. त्यात मनसेने देखील जनतेला ‘युतीया’ बनवायचं बंद करा, असं म्हणत या राजकीय पक्षांवर टीका केली आहे.  

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष अमेय खोपकर यांनी या गोंधळावर नाराजी व्यक्त करत अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. 

आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात की, अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. तरीही त्यांचे डोळे पुसायला कुठलाही राजकीय पक्ष धावून गेलेला नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना खऱ्या आधाराची गरज आहे. परंतु शिवसेना आणि भाजपचा सगळा वेळ स्वत:ची खुर्ची वाचवण्यात जात आहे. या गलिच्छ राजकारणाचा किळस आल्याचंही ते म्हणत आहेत.  



हेही वाचा-

पंतप्रधान मोदी, पवार यांच्यात ४५ मिनिटं भेट, काय झाली खलबतं?

सत्तास्थापनेबाबत गुरूवारी चित्र स्पष्ट होईल - संजय राऊत



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा