पंतप्रधान मोदी, पवार यांच्यात ४५ मिनिटं भेट, काय झाली खलबतं?

महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसला चांगली आॅफर मिळत असल्याच्या चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी दुपारी भेट घेतली.

SHARE

महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसला चांगली आॅफर मिळत असल्याच्या चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी दुपारी भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास ४५ मिनिटं बैठक झाली. या भेटीनंतर पंतप्रधानांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना तात्काळ बोलावून घेत दुसरी बैठक घेतली. यामुळे दिल्लीतील राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना पेव फुटलं.  

या बैठकीत पंतप्रधान मोदी आणि पवारांमध्ये महाराष्ट्रातील राजकीय पेचावर चर्चा झाल्याचं म्हटलं जात असलं, तरी या बैठकीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं पवारांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं. तसंच महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पंतप्रधानांना माहिती करून देत लवकरात लवकर मदत जाहीर करण्याची मागणी यावेळी केल्याचंही त्यांनी सांगितलं. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी साडेआठ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. परंतु ही मदत अद्याप मिळालेली नसून ती देखील अपुरी आहे. त्यामुळे २०१२-१३ साली देण्यात आलेल्या हेक्टरी ३० हजार रुपयांच्या मदतीनुसार मदत मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

बैठक सुरू असताना पंतप्रधानांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना बोलावून घेत त्यांना सूचना केल्याचंही म्हटलं जात आहे. हेही वाचा-

भाजपकडून पवारांना ‘राष्ट्रपती पदा’ची आॅफर ?

सत्तास्थापनेबाबत गुरूवारी चित्र स्पष्ट होईल - संजय राऊतसंबंधित विषय
ताज्या बातम्या