भाजपकडून पवारांना ‘राष्ट्रपती पदा’ची आॅफर ?

महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेत भाजपला एकटे पाडून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन पक्ष एकत्र येत असले. तरी तिघांचे एकमत अद्याप झालेले नाही. त्याचाच फायदा घेऊन भाजपने आता नवी खेळी केली आहे.

SHARE

सत्तास्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊ पाहत असताना, भाजपने शिवसेनेला अकटे पाडण्यासाठी आता एक नवी खेळी खेळल्याचे बोलले जाते. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील चित्र बदलण्याची शक्यता आहे. भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना 'राष्ट्रपती पदा'ची आॅफर दिल्याचे कळते आहे.  त्यातच आज दिल्लीत शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या भेट होणार असून पवार पुढे काय निर्णय घेतात. त्याकडे शिवसेना नेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. तरी उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांना आधारकार्ड व पाच दिवसांच्या कपड्यांसह मुंबईला तातडीने बोलवले आहे.

महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेत भाजपला एकटे पाडून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन पक्ष एकत्र येत असले. तरी तिघांचे एकमत अद्याप झालेले नाही. त्याचाच फायदा घेऊन भाजपने आता नवी खेळी केली आहे. शिवसेनेला एकटे पाडण्यासाठी भाजपने राष्ट्रवादीचे शरद पवार यांना “राष्ट्रपती पदाची”आॅफर दिल्याचे कळते. या बातमीने राजकारणातील सत्तास्थापनेचे चित्रच बदलण्याची शक्यता आहे. शिवसेनेला मागे टाकण्यासाठी भाजप पक्ष एक नवा डाव खेळत असल्याचे बोलले जाते. ही बातमी सर्वांना आश्चर्यचकित आणि धक्का देणारी असली. तरीही याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. किंबहुना राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी भाजपला  समर्थन देण्याविषयी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. जर राष्ट्रवादीने भाजपला समर्थन दिले तर अगदी सहजपणे ते सरकार स्थापन करतील असे चित्र दिसत आहे.  त्यातच आज दिल्लीत शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक होणार आहे.  


तर दुसरीकडे शिवसेना वारंवार असा दावा करत आहे की, ते काँग्रेस-राष्ट्रवादीसह सरकार बनविण्याविषयी आग्रही असून त्यावर काम सुरु आहे. मात्र शरद पवारांकडून अशी कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसून त्यांचे शिवसेनेवर अनेक टिकास्त्र सोडण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे जनताही संभ्रमात पडली आहे की सत्तास्थापनेचे नेमके काय होणार.तर दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, राज्यात शिवसेनाच सरकार बनवेल. मात्र पवार आणि मोदींच्या भेटीनंतर कदाचित राज्यातील राजकारणाला एक वेगळी दिशा मिळू शकते.


संबंधित विषय
ताज्या बातम्या