Advertisement

काँग्रेसच्या ‘या’ नेत्याने घेतली राऊतांची भेट


काँग्रेसच्या ‘या’ नेत्याने घेतली राऊतांची भेट
SHARES

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी कायदा मंत्री अश्विनी कुमार यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी राऊत यांच्याशी २० मिनिटे चर्चा केली. यावेळी महाशिवआघाडीच्या ‘किमान समान कार्यक्रमा’च्या मसुद्यावर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.  

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची मॅरेथॉन बैठक सुरू आहे. या बैठकीला शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे, जयराम रमेश, के.सी. वेणूगोपाल, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान, राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, खासदार सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, नवाब मलिक आदी नेते उपस्थित आहेत.

दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग आल्याने महाराष्ट्रातील सत्तापेच सुटण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.


हेही वाचा-

महाशिवआघाडीला सोनियांची मंजुरी?

सत्तास्थापनेबाबत गुरूवारी चित्र स्पष्ट होईल - संजय राऊतसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा