हार्बर सेवेचा लवकरच बोरिवलीपर्यंत विस्तार

हार्बर रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे.

हार्बर सेवेचा लवकरच बोरिवलीपर्यंत विस्तार
SHARES

हार्बर रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेच्या गोरेगाव स्थानकापर्यंत धावणारी हार्बर लोकल लवकरच बोरिवलीपर्यंत धावणार आहे. या सेवेचा बोरिवलीपर्यंत विस्तार करण्याचा गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला प्रस्ताव आता मार्गी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मार्गाच्या विस्ताराकरिता गोरेगाव ते बोरिवलीदरम्यन ड्रोन सर्वेक्षणाला पश्चिम रेल्वेनं सुरुवात केली असून, यासाठी सल्लागारही नियुक्त करण्यात येणार आहे.

प्रवाशांची मागणी

हार्बर मार्ग सीएसएमटी ते पनवेल व सीएसएमटी ते अंधेरी, गोरेगावपर्यंत आहे. याआधी गोरेगावऐवजी सीएसएमटी ते अंधेरीपर्यंतच हार्बर मार्ग होता. सीएसएमटीतून अनेक प्रवासी अंधेरीपर्यंत प्रवास करून नंतर पश्चिम रेल्वेनं पुढचा प्रवास करत होते. मात्र, प्रवाशांची होणारी गैरसोय आणि त्यांची मागणी लक्षात घेता प्रथम गोरेगावपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला.


हार्बर विस्तार

या प्रकल्पाचं काम मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून केलं जात होतं. अंधेरी ते गोरेगाव हार्बर विस्ताराच्या कामाला २००९ साली सुरुवात करण्यात आली. परंतु अनेक अडचणींमुळं हे काम डिसेंबर २०१७ मध्ये मार्गी लागलं. त्यामुळं ८८ कोटी रुपये असलेला प्रकल्प थेट २१४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. प्रत्यक्षात या मार्गावरून गोरेगावपर्यंत लोकल गाड्या मार्च २०१९ पासून धावू लागल्या. त्याला प्रतिसाद मिळाल्यानंतर गोरेगावपर्यंत असलेल्या हार्बर सेवेचा बोरिवलीपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


विस्ताराच्या कामाला गती

‘एमयूटीपी-३ ए’मध्ये गोरेगाव ते बोरिवली हार्बर विस्ताराचा समावेश केला गेला आहे. ‘एमयूटीपी-३ ए’ला मंजुरी मिळाल्यानंतर विस्ताराच्या कामाला गती देण्यास सुरुवात झाली आहे. ७ किलोमीटर लांबीच्या असलेल्या या प्रकल्पासाठी ८२६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यासंदर्भात चर्चगेट स्थानकात पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत गोरेगाव ते बोरिवली विस्तार प्रकल्पाचे प्रथम ड्रोन सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला.हेही वाचा -

जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धा: महाराष्ट्राच्या सागर कातुर्डेला सुवर्णपदक

औषधे मिळणार ४० टक्के सवलतीच्या दरात
संबंधित विषय