Advertisement

जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धा: महाराष्ट्राच्या सागर कातुर्डेला सुवर्णपदक

जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत ७५ किलो वजनी गटात महाराष्ट्राच्या सागर कातुर्डे यानं सुवर्णपदक पटकावलं आहे.

जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धा: महाराष्ट्राच्या सागर कातुर्डेला सुवर्णपदक
SHARES

जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत ७५ किलो वजनी गटात महाराष्ट्राच्या सागर कातुर्डे यानं सुवर्णपदक पटकावलं आहे. त्याचप्रमाणं या स्पर्धेत महाराष्ट्राच्या रोहित शेट्टी आणि वीरेश धोत्रे या शरीरसौष्ठवपटूंनीही रौप्यपदकाला गवसणी घातली आहे.

सर्वोत्तम खेळाडू

जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत भारताच्या चित्रेश नटेशन यानं सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला. दक्षिण कोरियातील जेजू आयलंड इथं झालेल्या जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत भारतानं सर्वाधिक यश संपादन केलं. ६ वेळा ‘भारत श्री’ तसंच ‘महाराष्ट्र श्री’ आणि ‘मुंबई श्री’ किताब पटकावणाऱ्या सागरनं आपल्या गटात भारताच्याच जयप्रकाश आणि सतीशकुमार यांच्यावर सरशी साधत सोनेरी यश संपादन केलं.

रौप्यपदकावर समाधान

आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील त्याचं हे पहिलंच पदक ठरलं आहे. १०० किलो वजनी गटात रोहित शेट्टीला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. या गटात भारताच्या दयानंद सिंगनं सुवर्णपदक पटकावलं आहे. वीरेश धोत्रेनेही रौप्यपदकी कामगिरी साकारली.



हेही वाचा -

औषधे मिळणार ४० टक्के सवलतीच्या दरात

आर्थिक मदत मिळत नसल्यानं मच्छिमार राज्यपालांवर नाराज



संबंधित विषय
Advertisement