Advertisement

शिवसेनेसोबत जाणे म्हणजे स्वतःला दफन करून घेणे; संजय निरुपम

. ‘महाराष्ट्रात शिवसेनेसोबत सरकार स्थापन करून, तिसऱ्या नंबरचा पक्ष होणे म्हणजे इथे काँग्रेसला दफन करण्यासारखे आहे’. काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी अशा आशयाचे ट्विट करत काँग्रेसलाच घरचा आहेर दिला आहे.

शिवसेनेसोबत जाणे म्हणजे स्वतःला दफन करून घेणे; संजय निरुपम
SHARES

मुंबईसह महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये असलेली दुफळी ही वेळोवेळी पहायला मिळाली. ऐकीकडे सत्तास्थापनेसाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते पुढाकार घेताना पहायला मिळत असताना. दुसरीकडे या शिवमहाआघाडीबाबत अनेक काँग्रेसमध्ये दुमत असल्याचे दिसून आले आहे.  ‘महाराष्ट्रात शिवसेनेसोबत सरकार स्थापन करून, तिसऱ्या नंबरचा पक्ष होणे म्हणजे इथे काँग्रेसला दफन करण्यासारखे आहे’. काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी अशा आशयाचे ट्विट करत काँग्रेसलाच घरचा आहेर दिला आहे.

 काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये बसपा सोबत युती करून काँग्रेसने मोठी चूक केली होती. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस इतक्या खाली गेले आहे, की आजपर्यंत ते पुढे नाही आले. महाराष्ट्रातदेखील आम्ही तीच चूक करत आहोत. शिवसेनेच्या सरकारमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळवणे हे महाराष्ट्रात काँग्रेस दफन करण्यासारखेच आहे. काँग्रेस अध्यक्षांनी कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी नाही पडले पाहिजे, असे निरूपम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी युतीच्या घडामोडींना कालपासून वेग आला आहे. काल दिवसभर सुरु असलेले बैठकांचे सत्र आजही सुरुच आहे. आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या वेगवेगळ्या आणि नंतर संयुक्त बैठका होणार आहेत. त्यानंतर उद्या (शुक्रवार) शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांची संयुक्त बैठक होऊन, युतीचा निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा