‘या’ पक्षाला मिळणार इतकी मंत्रीपदं

नव्या सरकारमध्ये कोण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होणार, याचबरोबर कुणाला किती ​मंत्रीपदं​​​ मिळणार? याचीही सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.

SHARE

नव्या सरकारमध्ये कोण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होणार, याचबरोबर कुणाला किती मंत्रीपदं मिळणार? याचीही सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. त्यानुसार तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी मिळून एक फाॅर्म्युला बनावला आहे. या फाॅर्म्युल्यानुसारच मंत्रीपदांचं वाटप करण्यात येणार आहे.

हेही वाचा- आता चर्चा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोण होणार याची?

हा फाॅर्म्युला आहे संख्येनुसार मंत्रीपद देण्याचा. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी ठरवल्यानुसार प्रत्येक पक्षाच्या प्रत्येकी ४ आमदारांमागे १ मंत्रीपद देण्यात येईल. त्यानुसार ५६ आमदार असलेल्या शिवसेनेला १४+ १ मुख्यमंत्रीपद अशी एकूण १५ मंत्रीपदं मिळतील, ५४ आमदार असलेल्या राष्ट्रवादीला १४+ १ मुख्यमंत्रीपद अशी एकूण १५ मंत्रीपदं मिळतील आणि ४४ आमदार असलेल्या काँग्रेसला ११+ १ उपमुख्यमंत्रीपद अशी एकूण १२ मंत्रीपदं मिळतील.

हेही वाचा- शिवसेना-राष्ट्रवादीला अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद?

तिन्ही पक्षांचं ‘किमान समान कार्यक्रमा’च्या मुद्द्यावरही एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे लवकरच नव्या सरकारच्या स्थापनेची घोषणा होऊ शकते. काँग्रेसने शुक्रवारी दुपारी ४ वाजता विधीमंडळ पक्षाची मुंबईत बैठक बोलवली आहे. या बैठकीत काँग्रेसचा विधीमंडळ गटनेता निवडण्यात येणार आहे. त्यासाठी काँग्रेसच्या सर्व आमदारांना मुंबईत बोलवण्यात आलं आहे. हेही वाचा- 

‘सेक्युलर’ शब्द घटनेतच, शिवसेनेला कुणीही शिकवू नये- राऊत

शिवसेनेसोबत जाणे म्हणजे स्वतःला दफन करून घेणे; संजय निरुपमसंबंधित विषय
ताज्या बातम्या