Advertisement

शिवसेना-राष्ट्रवादीला अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद?

महाराष्ट्रात लवकरच नव्या सरकारची घोषणा होण्याची शक्यता आहे. या सरकारमध्ये ​शिवसेना​​​ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्री असेल.

शिवसेना-राष्ट्रवादीला अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद?
SHARES

महाराष्ट्रात लवकरच नव्या सरकारची घोषणा होण्याची शक्यता आहे. या सरकारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्री असेल. बुधवारी उशीरा रात्री संपलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीत हे सूत्र ठरल्याचं म्हटलं जात आहे.

बुधवारी रात्री राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची मॅरेथाॅन बैठक झाली. या बैठकीला पवार यांच्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे, जयराम रमेश, के.सी. वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान, राष्ट्रवादीचे विधीमंडळ गटनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, खासदार सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, नवाब मलिक आदी नेते उपस्थित होते. 

हेही वाचा- ‘सेक्युलर’ शब्द घटनेतच, शिवसेनेला कुणीही शिकवू नये- राऊत

ही बैठक संपल्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादीला प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद, काँग्रेसला ५ वर्षे उपमुख्यमंत्रीपद मिळेल, असं ठरल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसंच शिवसेनेला १४ मंत्रीपदं, राष्ट्रवादीला १३ मंत्रीपदं, काँग्रेसला १२ मंत्रीपदं मिळतील, असंही म्हटलं जात आहे. तिन्ही पक्षांचे नेते राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक पाठिंब्याचं पत्र घेऊन शुक्रवारी किंवा शनिवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार असल्याची शक्यताही सूत्रांनी वर्तवली आहे. 

यावर बोलताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्रीपदाच्या वाटपाबद्दल अजून काहीही ठरलेलं नाही. तसंच आघाडीतील पक्षांनीही तशी मागणी केलेली नाही. यावर विनाकारण गोंधळ निर्माण करू नये. जो काही निर्णय होईल, तो सर्वांसमोर येईल. दिल्लीतील काम आता संपलं असून पुढील सगळ्या चर्चा मुंबईतच होतील. तिन्ही पक्षांची संयुक्त बैठकही मुंबईतच होईल.  हेही वाचा- 

शिवसेनेसोबत जाणे म्हणजे स्वतःला दफन करून घेणे; संजय निरुपम

आघाडीच्या नेत्यांची उद्धव ठाकरेंशी चर्चा- संजय राऊतसंबंधित विषय
Advertisement