Advertisement

आता चर्चा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोण होणार याची?

राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ​आघाडीचं​​​ नवं सरकार येणार हे जवळपास निश्चित झाल्याने सगळ्यांचं लक्ष वळलं आहे, ते या नव्या सरकारचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण होणार? याकडे.

आता चर्चा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोण होणार याची?
SHARES

राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचं नवं सरकार येणार हे जवळपास निश्चित झाल्याने सगळ्यांचं लक्ष वळलं आहे, ते या नव्या सरकारचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण होणार? याकडे. 

हेही वाचा- ‘सेक्युलर’ शब्द घटनेतच, शिवसेनेला कुणीही शिकवू नये- राऊत

या नव्या सरकारचं नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी करावं, अशी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची इच्छा आहे. कारण या दोन्ही पक्षांत मंत्रीपदाचा अनुभव असलेले ज्येष्ठ नेते आहेत. अशा तिन्ही पक्षातील नेत्यांवर नियंत्रण ठेवणारा, जरब असलेला नेता मुख्यमंत्रीपदी असेल, तरच हे सरकार पुढचे ५ वर्षे चालू शकेल, असं दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांना वाटत आहे. सद्यस्थितीत उद्धव ठाकरेंशिवाय असा एकही नेता शिवसेनेत दिसत नसल्याने त्यांनीच मुख्यमंत्रीपद स्वीकारावं, अशी मागणी होत आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे किंवा एकनाथ शिंदे ऐवजी उद्धव ठाकरेच ही जबाबदारी स्वीकारतील अशी चिन्हे आहेत.

हेही वाचा- शिवसेनेसोबत जाणे म्हणजे स्वतःला दफन करून घेणे; संजय निरुपम

तर, दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना उपमुख्यमंत्रीपदाची लाॅटरी लागू शकते. काँग्रेसकडे पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण अशी मुख्यमंत्रीपद भूषवलेले नेते असल्याने त्यांना पक्षाकडून उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे राज्यात ४४ जागा निवडून आणण्यासाठी मेहनत घेतलेले थोरात यांना बक्षीस म्हणून ही जबाबदारी मिळू शकते. तर उरलेल्या दोन नेत्यांपैकी एकाची वर्णी विधानसभा अध्यक्षपदी लागू शकते.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी विधीमंडळ गटनेते अजित पवार यांच्याशिवाय इतर कुणाचंही फारसं चर्चेत असल्याचं दिसत नाही.  



हेही वाचा-

महाशिवआघाडीला सोनियांची मंजुरी?

शिवसेना-राष्ट्रवादीला अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा