धक्कादायक! मुंबई महिलांसाठी असुरक्षितच, वाढले 'एवढे' गुन्हे

मुंबई शहर मुली आणि महिलांसाठी असुरक्षित बनू लागल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.

धक्कादायक! मुंबई महिलांसाठी असुरक्षितच, वाढले 'एवढे' गुन्हे
SHARES

मुंबई शहर मुली आणि महिलांसाठी असुरक्षित बनू लागल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. २०१८-१९ या वर्षात मुंबईत बलात्काराच्या घटनांमध्ये २२ टक्के वाढ झाली आहे. तर विनयभंगाचे गुन्हे ५१ टक्के वाढले आहेत. गंभीर बाब म्हणजे अत्याचार झालेल्या ६९ टक्के मुली या अल्पवयीन आहेत. तर अत्याचार करणारे ९० टक्के आरोपी हे ओळखीचेच आहेत. प्रजा फाऊंडेशन या संस्थेच्या अहवालातून हे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. 

एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत मुंबईत झालेल्या गुन्ह्यांची आकडेवारी प्रजा फाऊंडेशनने जाहीर केली आहे.  प्रजा फाऊंडेशनच्या अहवालानुसार, मुंबईत सोनसाखळी चोरी, घरफोडीचे गुन्हे घटले आहेत. मात्र, महिला अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे.  अल्पवयीन मुले आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण अधिक आहे. मुंबईत या एका वर्षात बलात्काराच्या घटना २२ टक्के तर विनयभंगाच्या घटना ५१ टक्के वाढल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुन्हे वाढत आहेत. मात्र, त्यांची उकल होण्याचं प्रमाण खूपच कमी असल्याचंही या अहवालातून समोर आलं आहे. 

मुंबईतील या गुन्ह्यांबाबत विधिमंडळात आवाज उठवण्यात लोकप्रतिनिधी कमी पडत आहेत. २०१८-१९ मध्ये आमदार राम कदम, राज पुरोहित आणि रमेश लटके यांनी मुंबईतील गुन्ह्यांबाबत एकही प्रश्न सभागृहात उपस्थित केला नसल्याचं प्रजा फाऊंडेशनने म्हटलं आहे. २०१४ ते २०१९ या पाच वर्षांच्या कालावधीत रमेश लटके यांनी पाच तर राम कदम यांनी अवघा एक प्रश्न उपस्थित केला आहे.

२०१८-१९ अल्पवयीन मुलींवरील वाढत्या गुन्ह्यांबाबत आमदारांनी केवळ दोनच प्रश्न उपस्थित केले. पोलिस अधिकाऱ्यांची कमतरता आणि न्यायालयातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी यावर कोणत्याच आमदाराने सभागृहांचे लक्ष वेधले नसल्याचं प्रजा फाऊंडेशनने अहवालात नमूद केलं आहे. हेही वाचा  -

दुर्दैवी! अखेर २ महिन्यांच्या दुर्घटनाग्रस्त प्रिन्सचा मृत्यू
संबंधित विषय