Advertisement

दुर्दैवी! अखेर २ महिन्यांच्या दुर्घटनाग्रस्त प्रिन्सचा मृत्यू

केईएम रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे शारीरिक स्वाथ्य बिघडलेल्या ​प्रिन्स​​​ राजभर या ४ महिन्यांच्या बाळाचा गुरूवारी मध्यरात्री २.४५ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला.

दुर्दैवी! अखेर २ महिन्यांच्या दुर्घटनाग्रस्त प्रिन्सचा मृत्यू
SHARES

केईएम रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे शारीरिक स्वाथ्य बिघडलेल्या प्रिन्स राजभर या २ महिन्यांच्या बाळाचा गुरूवारी मध्यरात्री २.४५ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. त्याचा रक्तदाब खालावत जाऊन रात्री २.३० वाजता प्रिन्सला हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा- हात गमावलेल्या 'प्रिन्स'च्या पालकांनी पालिकेची मदत नाकारली

मूळ उत्तर प्रदेशमधील असलेल्या पन्नेलाल राजभर यांनी हृदयविकारावरील उपचारांसाठी प्रिन्सला परळमधील केईएम रुग्णालयात दाखल केलं होतं. प्रिन्सला बालरोग विभागाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं. परंतु ६ नोव्हेंबरच्या मध्यरात्री प्रिन्सला लावलेल्या ईसीजी यंत्रणेत शाॅर्टसर्किट होऊन प्रिन्स होरपळला. प्रिन्सला ठेवण्यात आलेल्या बेडवरील चादरीलाही आग लागली. ज्यात प्रिन्सचा खांदा, कान आणि कमरेचा भाग भाजपला. प्रिन्सच्या हाताला गंभीर इजा झाल्याने त्याच्या रक्ताभिसरण प्रक्रियेत अडथळा येत होता. त्यामुळे त्याचा हात कापावा लागला होता.

तेव्हापासून त्याची प्रकृती सातत्याने खालावत होती. त्याला आॅक्सिजनची पातळी जास्त असलेल्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. परंतु त्याचा रक्तदाब खाली जात होता. त्याचं हृदय नियंत्रीत ठेवण्यासाठी प्रिन्सला ३ वेगवेगळी औषधं दिली जात असल्याची माहिती गुरूवारी केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. हेमंत देशमुख यांनी दिली होती. अखेर हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचा २ आठवड्यांपासून सुरू असलेला जगण्याचा संघर्ष थांबला.

हेही वाचा- केईएममधील त्या दुर्घटने प्रकरणी भोईवाडा पोलिसात गुन्हा दाखल

या दुर्घटनेचा अभ्यास करण्यासाठी महापालिकेने समिती नेमली होती. या समितीचा तसंच दुर्घटनेतील वैद्यकीय उपकरणांच न्यायवैद्यक अहवाल अजून आलेला नाही. प्रिन्सला १० लाख रुपयांची मदत महापालिकेकडून जाहीर करण्यात आली होती. त्यापैकी ५ लाखांची रक्कम प्रिन्सच्या वडिलांच्या खात्यात जमा करण्यात आली होती. 



हेही वाचा-

केईएम रुग्णालातल्या वरिष्ठ डाॅक्टरची आत्महत्या

औषधे मिळणार ४० टक्के सवलतीच्या दरात



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा