केईएम रुग्णालातल्या वरिष्ठ डाँक्टरची आत्महत्या

विषारी इंजेक्शन घेऊन प्रणय यांनी स्वत:ला संपवलं

SHARE

मुंबईच्या  केईएम रुग्णालयातील एका डॉक्टराने आत्महत्या केल्याची घटना शनिवारा सायंकाळी उघडकीस आली आहे. प्रणय जयस्वाल (28) असं  आत्महत्या केलेल्या डॉक्टरांचं नाव आहे. प्रणय हे रुग्णालयात ज्यूनिअर रेसिडंट डॉक्टर म्हणून काम करत होते. त्यांच्या अशा अचनाक आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे. या  प्रकरणी भोईवाडा पोलिसांत अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस अधिक तपास सुरू आहे.वैद्यकीय क्षेत्रात काम करत असल्यामुळे प्रणय यांना औषधांविषयी चांगली माहिती होती. त्याचा वापर त्यांनी आत्महत्या करण्यासाठी केला. विषारी इंजेक्शन घेऊन प्रणय यांनी स्वत:ला संपवलं. त्यांच्या आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पण पोलिसांना घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी किंवा इतर संशयास्पद वस्तू मिळाल्या प्रणय जयस्वाल हे मुंबईत नोकरीसाठी राहत होते.  मुळचे अमरावती जिल्ह्याचे आहे. त्यांच्या कुटुंबीयांना या प्रकरणाची माहिती देण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. या सगळ्या प्रकरणात पोलीस आता अधिक तपास करत आहे. प्रणय यांनी आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल का उचललं चौकशी आता पोलिसांकडून करण्यात येत आहे.


प्रणय यांच्या अशा अकाली जाण्यामुळे संपूर्ण केईएम रुग्णालयात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी प्रणय यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर प्रणयविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलीस आता रुग्णालयात चौकशी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.संबंधित विषय
ताज्या बातम्या