Advertisement

कल्याणमधील डम्पिंग ग्राऊंड लवकरच बंद

कल्याणकरांची डम्पिंगच्या दुर्गंधीतून आता लवकरच मुक्तता होणार आहे. डम्पिंग ग्राउंडवर पार्क बनविण्याचा पालिकेचा मानस आहे. येत्या दसऱ्यापासून आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडवर कचरा टाकणे बंद करण्याचे लक्ष्य प्रशासनाने ठेवले आहे.

कल्याणमधील डम्पिंग ग्राऊंड लवकरच बंद
SHARES
कल्याणकरांची डम्पिंगच्या दुर्गंधीतून आता लवकरच मुक्तता होणार आहे. डम्पिंग ग्राउंडवर पार्क बनविण्याचा पालिकेचा मानस आहे. येत्या दसऱ्यापासून आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडवर कचरा टाकणे बंद करण्याचे लक्ष्य प्रशासनाने ठेवले आहे. या डम्पिंग ग्राऊंडवरील कचरा स्क्रीनिंग करून काढून टाकला जाणार असून त्याठिकाणी उद्यान तयार करण्याचा प्रस्ताव तयार केला जाणार आहे. मागील अनेक वर्षापासून कचऱ्याच्या दुर्गंधीने त्रासलेल्या कल्याण पश्चिमेतील नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे.  


आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवर दररोज ६५० मेट्रिक टन कचरा जमा होतो. मात्र लॉकडाऊनच्या काळात पालिकेने कचरा वर्गीकरण मोहीम राबविल्याने त्यापैकी ५०० टन कचऱ्याचे नागरिकांकडून वर्गीकरण होत आहे. त्यामुळे सध्या १५९ टन कचरा डम्पिंगवर टाकला जात आहे. आधारवाडी  डम्पिंग ग्राऊंडची क्षमता कधीच संपली आहे. तरीही प्रशासनाकडून शहरातील कचरा कोणतेही वर्गीकरण न करता डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जात होता. या कचऱ्यामुळे येणारी दुर्गंधी आणि सतत लागणाऱ्या आगी यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. डम्पिंग बंद करण्याचे पालिकेचे अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. न्यायालय, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनीही पालिकेला डम्पिंग वरून फटकारले आहे. मे २०२० मध्ये पालिकेत उपायुक्त म्हणून रुजू झालेल्या रामदास कोकरे यांनी शहरात 'शून्य कचरा मोहीम' राबविण्याचा संकल्प केला. लॉकडाउन काळात कचरा वर्गीकरण शक्य नसल्याचे सांगत या मोहिमेला नागरिकांकडून आणि लोकप्रतिनिधींकडून विरोध झाला. तरीही 'शून्य कचरा' मोहीम सुरू ठेवत नागरिकांना कचरा वर्गीकरणाची सवय लावण्यात प्रशासनाला यश आले आहे.

हेही वाचा - 

मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावर धावणार लोकल?

मुंबई लोकलबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या राज्य सरकारला सूचना




  
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा