Advertisement

अमरावतीनंतर 'या' जिल्ह्यात लॉकडाऊन लागू

अमरावती जिल्ह्यात महाराष्ट्र सरकारनं शनिवार आणि रविवार लॉकडाउन लागू केला.

अमरावतीनंतर 'या' जिल्ह्यात लॉकडाऊन लागू
(Representational Image)
SHARES

अमरावती जिल्ह्यात महाराष्ट्र सरकारनं शनिवार आणि रविवार लॉकडाउन लागू केला. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी कोरोनाव्हायरसच्या रुग्णांमध्ये होणारी वाढ पाहता प्रशासनानं यवतमाळमध्ये दहा दिवसांचा लॉकडाउन लागू केला आहे.

जिल्हाधिकारी एम.डी.सिंग म्हणाले की, १ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात कोरोनाव्हायरसच्या संख्येत वाढ होत आहे. शाळा, महाविद्यालये, कोचिंग वर्ग बंद राहतील. या काळात कोणत्याही धार्मिक कार्यास परवानगी दिली जाणार नाही. विवाहसोहळ्यांमध्ये केवळ ५० जणांना परवानगी असेल.

यवतमाळ, पंढरकवडा आणि पुसद नगरपालिकांमध्ये दररोज सुमारे ५०० चाचण्या घेण्याचे आम्ही ठरवलं आहे, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

अहवालानुसार, महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अमरावती, यवतमाळ आणि अकोला इथल्या प्रशासनासोबत COVID 19 परिस्थितीवर बैठक घेतली. शिवाय, राज्याच्या विदर्भातील यवतमाळ, अमरावती आणि अकोला शहरांमध्ये कोणत्याही क्षणी सरकार कडक बंदोबस्त लागू करू शकेल अशी चर्चा झाली.

दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेनं शहरातील कोविडशी संबंधित नियम अधिक कडक केले आणि काटेकोरपणे पाळण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. आतापर्यंत मुंबईत कोणताही लॉकडाउन लागू केलेला नाही.

गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात ५ हजार ४२७ कोरोनव्हायरस रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी १८ फेब्रुवारी रोजी राज्यातील COVID 19 परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती.हेही वाचा

गोरेगाव, अंधेरी आणि जोगेश्वरी भागात 'या'दिवशी पाणीपुरवठा होणार प्रभावित

कुर्ला रेल्वे स्थानकात ई-बाइक सेवा सुरू, कुर्ला ते बीकेसी २५ रुपये दर

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा