Advertisement

पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत पुन्हा वाढ

मंगळवारी सकाळी इंधन दर वाढले असून, पेट्रोल प्रतिलीटर ८४ पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर ८३ पैशांनी वाढ होणार आहे.

पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत पुन्हा वाढ
SHARES

देशभरात पुन्हा एकदा पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. मंगळवारी सकाळी इंधन दर वाढले असून, पेट्रोल प्रतिलीटर ८४ पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर ८३ पैशांनी वाढ होणार आहे. मंगळवारी सकाळी ६ वाजल्यापासून हे नवे दर लागू झाले आहेत. दरम्यान, सततच्या वाढत्या महागाईमुळं सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

देशभरात तब्बल साडेचार महिन्यानंतर पेट्रोल-डिझेल महागलं आहे. उत्तर प्रदेशसह ५ राज्यातील निवडणूक निकालानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दरवाढ होणार असल्याची शक्यता याआधीच वर्तवण्यात आली होती. जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरेल ११२ डॉलर पोहचली आहे. त्यामुळं पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे.

गेल्या वर्षी ३ नोव्हेंबर २०२१ पासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नव्हती. मात्र आता तब्बल साडेचार महिन्यानंतर इंधन दरवाढ झाली आहे. या वाढत्या पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीमुळे वाहने चालवायची की नाही असा सवाल सर्वसामान्यांना सतावत आहे.

शहरातील पेट्रोल, डिझेलच्या किंमती

दिल्ली

  • पेट्रोल - 96.21 रुपये प्रति लीटर
  • डिझेल - 87.47 रुपये प्रति लीटर

मुंबई

  • पेट्रोल - 110.82 रुपये प्रति लीटर
  • डिझेल - 95.00 रुपये प्रति लीटर

चेन्नई

  • पेट्रोल - 102.16 रुपये प्रति लीटर    
  • डिझेल - 92.19 रुपये प्रति लीटर 

कोलकाता

  • पेट्रोल - 105.51 रुपये प्रति लीटर    
  • डिझेल - 90.62 रुपये प्रति लीटर 
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा