Advertisement

सुशांतच्या आत्महत्येच्या धक्क्यानं घरातील आणखी एका व्यक्तीचं निधन

एकिकडे मुंबईत सुशांत सिंह राजपूतवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर दुसरीकडे त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीचा सुशांतच्या मृत्यूच्या धक्क्यानं निधन झालं आहे....

सुशांतच्या आत्महत्येच्या धक्क्यानं घरातील आणखी एका व्यक्तीचं निधन
SHARES

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सुशांतच्या निधनातून अजून त्याचे कुटुंबं सावरलं नाही. त्यात आणखी एक धक्का त्यांना सहन करावा लागला आहे. सुशांतच्या आत्महत्येचं दु: ख त्यांची वहिनी सुधा देवी (भाभी) सहन करू शकली नाही. सुशांतवर मुंबईत अंत्यसंस्कार होत असतानाच सुधा देवी यांचा मत्यू झाला. 

सुशांतवर मुंबईत अंत्यसंस्कार होत असतानाच सुधा देवी यांचं निधान झालं.  सुशांतच्या निधनाचं कळातच सुधा देवी यांनीे खाणंपिणं सोडलं होतं. ती सुशांतसिंग राजपूत यांचं  गाव पूर्णियाच्या मालडीहा इथं राहत होती.


बिहारमध्ये शोकाकूळ वातावरण

सुशांतसिंग राजपूतनं मुंबईच्या वांद्रे इथल्या फ्लॅटमध्ये आत्महत्या केली होती. बातमी कळताच सर्वांना धक्का बसला. कुटुंबियच नाही तर बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीला देखील धक्का बसला. यासोबतच त्याच्या मुळ गावात देखील शोक व्यक्त करण्यास सुरुवात झाली. 

बिहारमधील पूर्णिया आणि पाटण्यातील राजीव नाझर भागातील मालडिहा हे त्याचं मूळ गाव आहे. इथल्या लोकांना आपले अश्रु इनावर झाले. सुशांतच्या बालपणाच्या आठवणी या दोन्ही ठिकाणी जोडल्या गेलेल्या आहेत. त्याच्या खगडियामध्ये असलेल्या ननिहालमध्येही शोकाचे वातावरण आहे.


वडील धक्क्यात

सुशांतच्या मृत्यूची बातमी समजताच त्याचे वडील केके सिंह बेशुद्ध झाले. ही बातमी ऐकताच काही काळापासून आजारी असलेल्या सुधा देवीची प्रकृती चिंताजनक झाली. त्या सारख्या बेशुद्ध होऊ लागल्या. नातेवाईकांनी त्यांचं सांत्वन केलं आणि डॉक्टरांना दाखवलं. पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही. कारण त्या शेवटपर्यंत सुशांतबद्दलच विचारत होत्या. तो कसा आहे?टिक आहे का?पण जेव्हा लोकांची गर्दी पाहिली तेव्हा त्यांना साधारण अंदाज आला. तेव्हा त्या बेशुद्ध पडल्या.

सुधा देवी यांचे पती आणि सुशांतचा चुलत भाऊ अमरेंद्र सिंग यांनी सांगितलं की, सोमवारी सकाळपासूनच सुधा देवीची प्रकृती बिघडू लागली. सायंकाळी ५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अमरेंद्र सिंह रडत म्हणाले की, पहिला भाऊ सोडून गेला, आता बायकोही गेली. आता मी कसा जगू?


सुशांतवर मुंबईत अंत्यसंस्कार

दुसरीकडे, सोमवारी सुशांतसिंग राजपूतचे वडील केके सिंह पटनाहून मुंबईला आले. सुशांतचा चुलत भाऊ आणि छत्रपूर बिहारचे आमदार नीरजसिंग बबलू (निरजसिंग बबलू) हे त्यांच्या वडिलांसोबत होते. त्यानंतर सुशांतवर अंत्यसंस्कार करण्यात आलं. त्याचवेळी, बिहारच्या पूर्णियामध्ये सुशांतचा चुलतभावा अमरेंद्र सिंग यांची पत्नी सुधा देवी यांचा धक्क्यानं मृत्यू झाला.



हेही वाचा

सुशांतची आत्महत्या होती की हत्या? : कंगना राणावत

सुशांत तू का झालास शांत?

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा