Advertisement

सुशांत सिंह राजपूत अनंतात विलीन, श्रद्धा कपूर, क्रिती सेनन सह 'या' कलाकारांची हजेरी

मुंबईतील विले पार्लेस्थित पवनहंस स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर अंत्यविधी पार पडला.

सुशांत सिंह राजपूत अनंतात विलीन, श्रद्धा कपूर, क्रिती सेनन सह 'या' कलाकारांची हजेरी
SHARES

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) अनंतात विलीन झाला आहे. मुंबईतील विले पार्लेस्थित पवनहंस स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर अंत्यविधी (Funeral) पार पडला. सुशांतचे वडील केके सिंह, मोठी बहीण आणि चुलतभाऊ आमदार नीरज कुमार हे यावेळी हजर होते.

सुशांतला अखेरचा निरोप देण्यासाठी त्याचे जवळचे मित्र आणि टीव्ही कलाकार स्मशानभूमीत दाखल झाले होते. अभिनेत्री श्रद्धा कपूर, अभिनेता अर्जुन बिजलानी हे इथं पोहोचले. 'छिछोरे' या चित्रपटात श्रद्धा कपूरनं सुशांतसोबत काम केले होतं. याशिवाय या चित्रपटात त्याच्यासोबत काम करणारा अभिनेता वरुण शर्मादेखील आपल्या को-स्टारला अलविदा करायला पोहोचला. दिग्दर्शक अभिषेक कपूर पत्नी प्रग्यासोबत स्मशानभूमीत दाखल झाले होते. अभिनेत्री कृति सेनन, विवेक ओबरॉय, रणवीर शौरी, उदित नारायण, राजकुमार राव, रणदीप हुड्डा हेदेखील इथं पोहोचले.

मुंबईत पाऊस असूनदेखील स्मशानभूमीच्या बाहेर रस्त्याच्या दुतर्फा चाहत्यांनी आपल्या लाडक्या अभिनेत्याला अलविदा करण्यासाठी गर्दी केली होती.

सुशांतची जवळची मैत्रीण रिहा चक्रवर्तीदेखील स्मशानभूमीत दाखल झाली होती. ती सोमवारी सकाळी कूपर हॉस्पिटलमध्ये जिथे सुशांतचे पार्थिव ठेवण्यात आले होते, तेथे देखील गेली होती. रिहा चक्रवर्तीने कूपर हॉस्पिटलमध्ये जाऊन सुशांतचे अंत्यदर्शन घेतले होते.

१४ जून रोजी सुशांतनं त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. १५ जून रोजी सकाळी त्याच्या पार्थिवाचं शवविच्छेद करण्यात आलं. प्राथमिक अहवालात फास घेतल्यानं श्वास कोंडून सुशांतचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. तीन डॉक्टरांच्या टीमनं सुशांतच्या मृतदेहाची ऑटोप्सी केली. त्यानंतर वांद्रे ठाण्यात त्याचा प्राथमिक अहवाल देण्यात आला आहे. सुशांत सिंहनं आत्महत्या केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. अद्याप कोणतीही नोट मिळाली नसल्याचं मुंबई पोलिसांचे प्रवक्ते डीसीपी प्रणय अशोक यांनी सांगितलं.

दरम्यान, सुशांतच्या मृतदेहाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ते पाहता महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलनं चेतावणी दिली आहे. सुशांतच्या मृतदेहाचे फोटो शेअर करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचं सायबर सेलच्या वतीनं म्हटलं गेलं आहे.


हेही वाचा

सुशांतनं आत्महत्येपूर्वी 'या' अभिनेत्याला केला होता फोन, पण...

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा