Advertisement

मॉल्समध्ये करणार महापौर कोरोना जनजागृती


मॉल्समध्ये करणार महापौर कोरोना जनजागृती
SHARES

मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ पाहता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या स्वत: जनजागृती करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या. लोकल आणि रस्त्यावर विनामास्क फिरणाऱ्या लोकांना त्यांनी समज दिली होती. त्याचबरोबर कोरोनाबाबत जनजागृतीही करण्यात आली होती. लोकलनंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर कोरोनासंदर्भात जनजागृतीसाठी विविध मॉल्सना भेटी देणार आहेत.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. किशोरी पेडणेकर यांनी याआधी रेल्वेमध्ये फिरुन कोरोनाबाबत जनजागृती केली होती. मात्र लोकांमध्ये कोणतीही सतर्कता असेलेली दिसून आली नाही. लोकल, सस्त्यावरील फेरीवाले यांच्याप्रमाणेच मुंबईतील मॉल्समध्येही लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत. मॉल्स त्याचप्रमाणे पबमध्ये होणाऱ्या गर्दीवरही कठोर कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत.

पबमालकांसोबत पबमध्ये गर्दी करणाऱ्यांनावरसुद्धा कारवाई केली जाणार आहे. तर पब मालकावर MRTP ची कारवाई करण्यात येणार आहे. मॉल्स किंवा पबमध्ये गर्दी करणाऱ्यावर कलम १९९ अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रशासनाला दिले आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा