गुरुवारी अहमदाबाद विमानतळाजवळ एअर इंडियाचे विमान कोसळले, प्राथमिक माहितीनुसार विमानात सुमारे 242 प्रवासी आहेत. विमान लंडनला उड्डाण करत असताना ही घटना घडल्याचे मानले जात आहे. मेघानीनगर परिसरातील धारपूरमधून प्रचंड धुराचे लोट दिसत आहेत.
AI171 बोईंग 787 हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. विमानात 242 प्रवासी, 10 केबिन क्रू आणि 2 पायलट होते. उड्डाण केल्यावर अवघ्या 2 किमीच्या अंतरावरच विमानाचा अपघात झाला. हे विमान मेघानीनगरच्या धारपूरमधील एका रहिवासी इमारतीवर कोसळलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विमानात 169 भारतीय, 53 ब्रिटीश, 7 पोर्तुगिज, 1 कॅनेडीयन तसेच 11 लहान मुलं आणि 2 नवजात बालकं प्रवास करत होते.
अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे आणि आपत्कालीन प्रतिसाद पथके तैनात केली जात आहेत. अधिकाऱ्यांनी अद्याप अपघाताचे कारण निश्चित केलेले नाही.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी चर्चा केली असून मुख्यमंत्री तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत.