Advertisement

लॉकडाऊन संदर्भात काय म्हणाले अजित पवार? बुधवारी...

लॉकडाऊन संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवरांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.

लॉकडाऊन संदर्भात काय म्हणाले अजित पवार? बुधवारी...
SHARES

लॉकडाऊन संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवरांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पुण्यात कोरोनाची आढावा बैठक घेण्यात आली होती.

"कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत बुधवारी सकाळी नऊ वाजता अत्यंत महत्त्वाची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित असतील. जे निर्णय इथे घेण्यासारखे होते ते मी जाहीर करतोय. जे निर्णय राज्य सरकारनं मुंबईत बसून घेतले पाहिजे त्यासाठी बुधवारी सकाळी नऊ वाजता बैठक आहे. त्या बैठकीत आम्ही त्याबाबत ठरवू. नंतर मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून देऊ, मुख्यमंत्री त्यावर निर्णय घेतली. त्यानंतर तो निर्णय सगळीकडे जाहीर करु", असं अजित पवार यांनी सांगितलं.

पुण्यात दिवसभरात तब्बल १ हजार १०४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रशासनानं वेगवेगळ्या उपाययोजना आणि कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. याच कठोर निर्बंधांपैकी एक म्हणजे पुण्यात बुधवारपासून मास्कशिवाय कुणी फिरताना दिसलं तर त्याला थेट ५०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.

तसंच कुणी थुंकताना दिसलं तर त्या व्यक्तीकडून थेट १०० रुपयांचा दंड घेतला जाईल, असं अजित पवार यांनी जाहीर केलं.

"मुंबई आणि पुण्यावर कोरोना संकट मोठ्या प्रमाणात आलं आहे. त्यामुळे पुण्यात आता उद्यापासून मास्क असेल तर ५०० रुपये दंड आणि थुंकलात तर १००० रुपये दंड अशी दंडात्मक कारवाई अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. दोन्ही लस ज्यांनी घेतली नसेल तर कोणतीही हॉटेल, शासनाचे कार्यालय अशा वेगवेगळ्या ठिकाणी परवानगी दिली जाणार नाही", असं अजित पवारांनी सांगितलं.

दरम्यान, महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय की, ओमिक्रॉनला घाबरू नका. मात्र, सारे चिंताजनक आहे. लॉकडाऊन असताच कामा नये. आत्ता सगळे सावरतायत. लॉकडाऊनमुळे सर्वांचे कंबरडे मोडले आहे. आपण प्रत्येकाने ठरवले तर लॉकडाऊन टाळता येईल. गर्दी करणार नाही, गर्दीत जाणार नाही, असा निर्धार करा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

तर त्या पुढे म्हणाले की, घरातील सर्वांचे लसीकरण करा. मास्क काढणार नाही. बसमध्ये काय सगळीकडेच नियम पाळेन. मास्क न लावता फिरणार नाही. आपल्यामुळे इतरांचे हाल होणार नाहीत, याची काळजी घ्या. शिवाय २० हजारांचा आकडा क्रॉस झाला, तर केंद्राच्या नियमानुसार राज्य सरकार आणि महापालिका या नियमांची पूर्तता करेल.हेही वाचा

मुंबईत नवे रुग्ण १० हजारांच्या पार, निर्बंध लागण्याची शक्यता

इंडिगोची 'या' मार्गावरील अनेक उड्डाणं रद्द

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा