Advertisement

मुंबईत नवे रुग्ण १० हजारांच्या पार, निर्बंध लागण्याची शक्यता

बुधवारच्या बैठकीत मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या अनुशंगानं महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

मुंबईत नवे रुग्ण १० हजारांच्या पार, निर्बंध लागण्याची शक्यता
(Representational Image)
SHARES

मुंबईत मंगळवारी तब्बल १० हजार पेक्षा जास्त नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ६५४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मुंबईचा रिकव्हरी रेट ९२ टक्के असून सध्याच्या घडीला वाढलेल्या सक्रिय रुग्णसंख्येनं चिंतेत भर पडली आहे. ४७ हजार ४७६ सक्रिय रुग्ण एकट्या मुंबईत असल्याचं आजच्या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे.

मंगळवारी (४ जानेवारी) रोजी पालिकेनं दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत नव्या १०, ८६० रुग्णांची भर पडली आहे. तर ६५४ रुग्ण दिवसभरात बरे झाले आहेत. आतापर्यंत मुंबईत एकूण ७,५२,०१२ इतके रुग्ण बरे झाले असून मुंबईचा रिकव्हरी रेट हा ९२% इतका नोंदवण्यात आला आहे.

मुंबईत बुधवारी महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या अनुशंगानं महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

मुंबईमध्ये शाळांबाबतचा निर्णय सोमवारी घेण्यात आला होता. त्यानंतर आता महाविद्यालयांबाबतही बुधवारी निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय की, ओमिक्रॉनला घाबरू नका. मात्र, सारे चिंताजनक आहे. लॉकडाऊन असताच कामा नये. आत्ता सगळे सावरतायत. लॉकडाऊनमुळे सर्वांचे कंबरडे मोडले आहे. आपण प्रत्येकाने ठरवले तर लॉकडाऊन टाळता येईल. गर्दी करणार नाही, गर्दीत जाणार नाही, असा निर्धार करा.

त्या पुढे म्हणाल्या की, घरातील सर्वांचे लसीकरण करा. मास्क काढणार नाही. बसमध्ये काय सगळीकडेच नियम पाळेन. मास्क न लावता फिरणार नाही. आपल्यामुळे इतरांचे हाल होणार नाहीत, याची काळजी घ्या. शिवाय २० हजारांचा आकडा क्रॉस झाला, तर केंद्राच्या नियमानुसार राज्य सरकार आणि महापालिका या नियमांची पूर्तता करेल.


हेही वाचा

कॉर्डेलिया क्रूझवरील सर्व प्रवाशांची RT-PCR चाचणी होईल, त्यानंतरच...

राज ठाकरेंच्या सुरक्षा ताफ्यातील एकाला कोरोना, म्हणून...

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा