Advertisement

इंडिगोची 'या' मार्गावरील अनेक उड्डाणं रद्द

आगामी ३ महिन्यांसाठी 'या' मार्गांवर मर्यादित विमानांचे उड्डाणे असतील.

इंडिगोची 'या' मार्गावरील अनेक उड्डाणं रद्द
SHARES

कोविड बाधितांच्या आकड्याचा आलेख दिवसागणिक उंचावतो आहे. त्यामुळे हवाई वाहतूक क्षेत्रातील आघाडीची कंपनी इंडिगो एअरलाईन्सनं (IndiGo airlines) उड्डाणांच्या संख्या मर्यादित केल्या आहेत.

कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे ‘इंडिगो’नं पश्चिम बंगालवरून दिल्ली आणि मुंबईच्या दिशेनं होणाऱ्या उड्डाणांची संख्या कमी केली आहे.

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, आगामी ३ महिन्यांसाठी या मार्गांवर मर्यादित विमानांचे उड्डाणे होणार असल्याची माहिती इंडिगोच्या सूत्रांनी दिली आहे. मर्यादित उड्डाणांमुळे प्रवाशांना त्रासाला सामोरं जावं लागू शकतं तसंच विमान कंपन्यांद्वारे भाडेवाढीची शक्यताही नाकारता येत नाही.

पश्चिम बंगाल (West Bengal) सरकारने कोविड-19 प्रादूर्भावाला अटकाव घालण्यासाठी सार्वजनिक वावरावर मोठ्या प्रमाणात निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधून मुंबई आणि दिल्लीसाठी आठवड्यातून केवळ दोनच दिवस विमानांचे आगमन-निर्गमन होणार आहे.

इंडिगोने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या कोलकाता, दुर्गापूर आणि बगडोगरा वरून दिल्ली आणि मुंबईसाठी आठवड्यातून केवळ दोन दिवसांसाठी (सोमवार आणि शुक्रवार) विमानं उड्डाण घेतील. आगामी तीन महिन्यांसाठी पश्चिम बंगाल ते मुंबई आणि पश्चिम बंगाल ते दिल्ली या मार्गावर इंडिगोच्या उड्डाणांची संख्या मर्यादित असणार आहे.

इंडिगोच्या निर्णयामुळे अनेक प्रवाशांचे नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे. इंडिगोकडून प्रवाशांना उड्डाण रद्द झाल्याची सूचना देण्यात आल्या आहेत. तिकीट आरक्षित केलेल्या प्रवाशांनी तिकीट भाड्याच्या परताव्यासाठी दावा करण्याचं आवाहन एअरलाईन्सच्या वतीनं करण्यात आलं आहे.

तिकीट रद्द करुन उपलब्ध उड्डाणाची निवड करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यासाठी प्रवाशांना इंडिगो वेबसाइट www.goindigo.in वर जाऊन ‘Plan B’ वर क्लिक करावे लागेल.



हेही वाचा

पुढचे ३-४ दिवस मध्य रेल्वेची लोकल उशिरा धावणार

आता 'या' मार्गावरही धावणार एसी लोकल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा