Advertisement

पुढचे ३-४ दिवस मध्य रेल्वेची लोकल उशिरा धावणार


पुढचे ३-४ दिवस मध्य रेल्वेची लोकल उशिरा धावणार
SHARES

मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. नेहमीच लोकल प्रवसावेळी लोकल या १० ते १५ मिनिटं उशिराने धावल्याच्या तक्रारी प्रवासी करत असतात. मात्र आता मध्य रेल्वेनं स्वतःच लोकल प्रवासास उशीर होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने ठाणे ते दिवा विभागातील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या महत्त्वाच्या कामासाठी २ जानेवारीच्या पहाटेपासून ३ जानेवारीच्या पहाटेपर्यंत २४ तासांचा मेगाब्लॉक घेतला होता. आता हे काम पूर्ण झालं आहे. मात्र तरीही गाड्यांच्या वेगावर काही निर्बंध घालण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. त्यामुळे पुढचे तीन चार दिवस ह्या गाड्या १५-२० मिनिटे उशिरा धावतील.

'ठाणे दिवा स्लो लाइनवरच्या २४ तासांच्या मेगाब्लॉकनंतर, सुरक्षेसाठी पुढील तीन चार दिवस गाड्यांच्या वेगावर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे पुढचे तीन चार दिवस गाड्या १५ ते २० मिनिटे उशिरा धावणार आहे. शक्य तितक्या लवकर हे निर्बंध दूर केले जातील', असं मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्वीट करत म्हटलं.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने ठाणे ते दिवा विभागातील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या महत्त्वाच्या कामासाठी २ जानेवारीच्या पहाटेपासून ३ जानेवारीच्या पहाटेपर्यंत २४ तासांचा मेगाब्लॉक घेतला होता. त्यामुळे ठाणे ते कल्याण या मुंबईकडे जाणाऱ्या तसंच डाऊन म्हणजे कल्याणकडे जाणाऱ्या मार्गावरील लोकस बंद होत्या.

ज्या सुरू होत्या त्या जलद मार्गावरुन वळवण्यात आल्या होत्या. याच काळात कळवा. मुंब्रा, दिवा, कोपर आणि ठाकुर्ली या स्थानकांवर लोकल थांबणार नसल्याचं रेल्वेने जाहीर केलं होतं.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा