Advertisement

मुंबईकरांचं पिण्याच्या पाण्याचे टेन्शन दूर, ८४.२१ टक्के पाणीसाठा उपलब्ध

अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या ७ धरणांतून मुंबईला रोज ३८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो.

मुंबईकरांचं पिण्याच्या पाण्याचे टेन्शन दूर,  ८४.२१ टक्के पाणीसाठा उपलब्ध
SHARES

मुंबईकरांचं पिण्याच्या पाण्याचे टेन्शन आता दूर झालं आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या सातही धरणांत १२ लाख १८ हजार ८८० दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.  पुढील साडेदहा महिने म्हणजेच ३० जून २०२२ पर्यंत हा पाणीसाठा पुरणार आहे. 

अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या ७ धरणांतून मुंबईला रोज ३८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणात १४ लाख ६३ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. सातही धरणांत १२ लाख १८ हजार ८८० दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. हा पाणीसाठा ३० जून २०२२ पर्यंत पुरेल इतका उपलब्ध झाला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव १६ जुलै, विहार तलाव १८ जुलै, मोडक सागर व तानसा तलाव २२ जुलैला ओसंडून वाहू लागले. तर उर्वरित तीन तलावांत पावसाची संततधार अशीच सुरु राहिल्यास तेही लवकरच भरुन वाहू लागतील.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा