Advertisement

ड्रायव्हर, घरकाम करणाऱ्यांना सोसायटीत येऊ द्या- बाळासाहेब पाटील

गृहनिर्माण संस्थांच्या आवारात काम करणाऱ्यांना, कामगारांना गृहनिर्माण संस्थांनी प्रवेश नाकारू नये, असं आवाहन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी पुन्हा एकदा गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष, सरचिटणीस यांना केलं आहे.

ड्रायव्हर, घरकाम करणाऱ्यांना सोसायटीत येऊ द्या- बाळासाहेब पाटील
SHARES

कोरोना विषाणूचा संसर्ग  टाळण्यासाठी  शासनाने अनेक उपाय योजना केल्या आहेत. मात्र गृहनिर्माण संस्थांच्या आवारात घर कामगार व वाहनचालकांना शासनाने प्रवेश प्रतिबंधित केलेला (allowed cook servant and driver in housing society says maharashtra cooperation minister balasaheb thorat) नाही, त्यामुळे गृहनिर्माण संस्थांच्या आवारात काम करणाऱ्यांना, कामगारांना गृहनिर्माण संस्थांनी प्रवेश नाकारू नये, असं आवाहन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी पुन्हा एकदा गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष, सरचिटणीस यांना केलं आहे. 

सभासदांच्या तक्रारी

यासंदर्भात पाटील म्हणाले, कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांमध्ये घर कामगार व वाहनचालक यांना गृहनिर्माण संस्थांच्या आवारात कामकाजाकरिता प्रवेश प्रतिबंधित केलेला नाही.  मात्र काही गृहनिर्माण संस्था या कामगारांना प्रवेश प्रतिबंधित करत आहेत. तसंच गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी संस्थांच्या स्तरावर शासनाच्या निर्देशाच्या विपरीत नियमावली तयार करत असल्याच्या सभासदांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.

कामगारांना प्रवेश देण्यासंदर्भात गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावं. तसंच शासन नियमांच्या विपरीत गृहनिर्माण संस्थांनी नियम तयार करू नयेत, अशा सूचनाही पाटील यांनी केल्या आहेत.

नाहक निर्बंध

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मागील अडीच महिने मुंबईत सुरू असलेलं लॉकडाऊन ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत शिथिल करण्यात आलं आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार मुंबईतील व्यवहार टप्प्याटप्प्यानं सुरू करण्यात येत आहेत. परंतु अजूनही काही सोसायट्यांमधील रहिवाशांना कडक नियमांचं पालन करावं लागत आहे. याची दखल राज्याचे सहकार व पणनमंत्र्यांनी घेतली आहे. 

मुंबई, पुणे तसंच राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये मोठमोठ्या गृहनिर्माण सोसायट्या आहेत. या सोसायट्यांमध्ये वयोवृद्ध लोक राहतात त्यांच्या घरी स्वयंपाक करण्यासाठी बाहेरील महिला येतात, ड्रायव्हर येतात, त्यांना प्रवेश दिला जात नाही. तसंच दूध, भाजीपाला पुरवठा करणाऱ्यांना आणि कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना गृहनिर्माण सोसायटी चेअरमन, संचालक मंडळ अनावश्यकपणे निर्बंध घालत आहे. तरी राज्यातील सर्व गृहनिर्माण सोसायट्यांनी केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करावं, असंही आवाहन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा