Advertisement

आनंद महिंद्रांनी केलं मुंबई महापालिकेचं कौतुक

आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करुन कोरोनाशी निकराचा लढा देणाऱ्या मुंबई महापालिकेचं कौतुक केलं आहे. महिंद्रा यांनी ट्वीटसोबत महापालिकेचा डॅशबोर्डही शेअर केला आहे.

आनंद महिंद्रांनी केलं मुंबई महापालिकेचं कौतुक
SHARES

राज्यात मुंबईमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. मात्र मागील चार महिने कोरोनाविरोधात मुंबई महापालिकेने लढा देऊन कोरोनावर नियंत्रण मिळवलं आहे. मुंबई महापालिकेच्या या कामाचं महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी कौतुक केलं आहे. कोरोनाच्या प्रत्येक दिवसाच्या परिस्थितीची इत्यंभूत माहिती देणारा मुंबई महापालिकेचा डॅशबोर्ड हा इतर शहरांसाठी आदर्श नमुना आहे, असं आनंद महिंद्रा यांनी म्हटलं आहे.


आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करुन कोरोनाशी निकराचा लढा देणाऱ्या मुंबई महापालिकेचं कौतुक केलं आहे. आनंद महिंद्रा यांनी ट्वीटसोबत महापालिकेचा डॅशबोर्डही शेअर केला आहे. ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं की, कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी मुंबई महापालिकेने सुरूवातीपासूनच कंबर कसली आहे. मधल्या काळात रुग्णांची संख्या वाढल्यानं परिस्थिती काहीशी चिंताजनक झाली होती.  मात्र, नंतर वेगानं परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आलं.


कोविडग्रस्त रुग्णांना खाटा उपलब्ध करून देणे, त्यांच्यावर उपचार करणे आणि संसर्ग कमीत कमी होईल याची काळजी घेण्यावर महापालिकेचा भर आहे.  मुंबईत अजूनही आयसीयू आणि व्हेंटिलेटरची सुविधा असलेल्या बेड्सची गरज आहे. मात्र, पहिल्या पेक्षा परिस्थिती नक्कीच चांगली आहे,' असंही त्यांनी म्हटलं आहे.



हेही वाचा -

राज्यात ९८९५ कोरोना रुग्णांची दिवसभरात नोंद, पाहा तुमच्या भागातील रुग्णांची संख्या किती

मुंबईत कोरोनाचे १२५७ नवे रुग्ण, ५५ जणांचा दिवसभरात मृत्यू




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा