Advertisement

मनसेची बॅनरबाजी, पालिकेची खड्डे भरणी


मनसेची बॅनरबाजी, पालिकेची खड्डे भरणी
SHARES

मुंबई - खड्डे आंदोलनप्रकरणी मनसेचे महापालिका गटनेते संदीप देशपांडे आणि नगरसेवक संतोष धुरी यांना अटक करण्यात आली. एकीकडे ‘यांचा गुन्हा काय’ असे फलक मनसेने संपूर्ण मुंबईभर लावले आहेत. तर दुसरीकेड महापालिका कामाला लागलीय. रविवारी महापालिकेने सर्व विभाग कार्यालयांतील कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या. त्यानंतर रस्त्यांवरील उखडलेले पेव्हरब्लॉक तसेच खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले.

रविवारीही सात रस्ता इथल्या सानेगुरुजी मार्ग, जे. जे जवळील रस्ते, के.के. मार्ग, लव्हलेन, मोतीशहॉ लेन, रामभाऊ भोगले मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग आदी ठिकाणच्या रस्त्यांवरील खड्डे तसेच पेव्हर ब्लॉक डागडुजीचे काम सुरू झाले आहे.

‘महापालिकेचा अजब न्याय’ अशा शिर्षकाखाली फुकटचा अवाढव्य पगार घेणाऱ्या, कामचुकार, मस्तवाल अधिकाऱ्यांना कामाची जाणीव करून देणे हा गुन्हा आहे का? असा सवाल मनसेने बॅनरबाजीच्या माध्यमातून मुंबईकरांना विचारला आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा