Advertisement

अंधेरीचं 'स्वप्नाक्षय मित्रमंडळ' गणेश गौरव स्पर्धेत अव्वल

श्री गणेश गौरव पुरस्कार-२०१८ स्पर्धेत अंधेरी पश्चिम सात बंगला येथील स्वप्नाक्षय मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर द्वितीय क्रमांक शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पटकावला आहे.

अंधेरीचं 'स्वप्नाक्षय मित्रमंडळ' गणेश गौरव स्पर्धेत अव्वल
SHARES

मुंबई महापालिकेच्या जनसंपर्क विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या श्री गणेश गौरव पुरस्कार-२०१८ स्पर्धेत अंधेरी पश्चिम सात बंगला येथील स्वप्नाक्षय मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर द्वितीय क्रमांक शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पटकावला आहे. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी शनिवारी या स्पर्धेचा निकाल जाहीर करत ही घोषणा केली.


तीन क्रमांकांची निवड

महापालिकेने आयोजित केलेल्या 'श्री गणेश गौरव स्पर्धा २०१८'चा निकाल शनिवारी महापौर निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला. महापालिकेच्या जनसंपर्क विभागाने परीक्षकांची तीन पथकं तयार केली होती. 


या पथकांनी मुंबईतील ७४ गणेशमंडळांना भेटी देऊन अंतिम विजेत्यांची नावं निश्चित केली होती. त्यानुसार, प्रथम तीन क्रमांकांची निवड करण्यात आली. याशिवाय सर्वोकृष्ट मूर्तीकार, सर्वोकृष्ट नेपथ्यकार, शाडूची मातीची मूर्ती, प्लास्टिक बंदी/ थर्माकोल बंदी, अवयवदान जागृती, प्रबोधन, पर्यावरण तसेच सामाजिक कार्यासाठी आदी प्रवर्गातून निवड करण्यात आली आहे.

याप्रसंगी जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त अशोक खैरनार, जनसंपर्क अधिकारी विजय खबाले पाटील आणि परीक्षक उपस्थित होते. याप्रसंगी स्पर्धेच्या परीक्षण कामाकरता मिळालेले मानधन सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक आणि परीक्षक ममता परब व पत्रकार मारुती मोरे यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडे महापौर निधीकरता दिले.

  • प्रथम क्रमांक (७५ हजार रुपये)

स्वप्नाक्षय मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव, मॉडेल टाऊन, सात बंगला, अंधेरी (पश्चिम)

  • द्वितीय क्रमांक (५० हजार रुपये)

शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, प्रेमनगर कांजूरगाव (पूर्व)

  • तृतीय क्रमांक (३५, हजार रुपये)

गं. द. आंबेकर मार्ग (मध्य विभाग) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, गणेश मैदान

  • सर्वोत्कृष्ट मूर्तीकार (२५ हजार रुपये)

सतिश गिरकर, श्री गणेश क्रीडा मंडळ, जाधव चाळ, चकाला, अंधेरी (पूर्व)

  • सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार (२० हजार रुपये)

स्वप्नील नाईक, ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शेठ मोतीशाह लेन, माझगांव

  • दोन उत्तेजनार्थ पारितोषिके (प्रत्येकी १० हजार रुपये)

नवतरुण मित्रमंडळ सार्वजनिक गणेशोत्सव, गांवदेवी मंदिर, कोंकणीपाडा, दहिसर (पूर्व)

श्री हनुमान सेवा मंडळ, काळा किल्ला, संत रोहिदास मार्ग, धारावी

  • शाडू मातीची सर्वोत्कृष्ट मूर्ती - पारितोषिके (२५ हजार रुपये)

पचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ, ना. म. जोशी मार्ग,

  • प्लास्टीक बंदी / थर्माकोल बंदी उत्तेजनार्थ दोन पारितोषिकेः (प्रत्येकी १० हजार रुपये)

महादेवाची वाडी ते वागेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, गं. द. आंबेकर मार्ग, परळ

साईराज गणेशोत्सव मंडळ, शहाजी राजे मार्ग, विलेपार्ले (पूर्व)

  • वयवदान जागृतीः पारितोषिक (१५ हजार रुपये)

बाल मित्र कला मंडळ, स्टेशन मार्ग, विक्रोळी (पश्चिम)


उत्कृष्ट मूर्तीसाठी :

  • इलेव्हन इव्हिल्स क्रिकेट क्लब, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, संत कक्कया मार्ग, धारावी
  • पंगेरी चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (राणीबागचा राजा), राणीबाग
  • शास्त्रीनगर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, शास्त्री नगर, गोरेगाव पश्चिम


नेपथ्यासाठी :

  • अंधेरीचा महागणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, डी.एन. नगर अंधेरी पश्चिम
  • सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, वाकोला यशवंत नगर, सांताक्रूझ पूर्व
  • श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कस्तूरपार्क, बोरिवली पश्चिम
  • पार्कसाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,शिवाजी मैदान, विक्रोळी पश्चिम


प्रबोधनासाठी :

  • बाळ गोपाळ मित्रमंडळ (विलेपार्लाचा पेशवा), श्रद्धानंद मार्ग, विलेपार्ले पूर्व
  • मापलावाडी सार्वजनिक उत्सव मंडळ, मापलाव शेठ मोतीशाह लेन, माझगांव
  • सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कांजूर शिवसेना शाखा, कांजूरगाव पूर्व
  • गोलदेऊळ सार्वजनिक उत्सव मंडळ, गिरगाव, मुंबई
  • रायगड चौक सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, श्री रामदूत हनुमान मंदिराशेजारी, घाटकोपर पूर्व


पर्यावरण :

  • बाळ मित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, दयालदास मार्ग, विलेपार्ले पूर्व
  • जय हनुमान सार्व. गणेशोत्सव मंडळ, काळा मारुती मंदिरासमोर, महात्मा गांधी मार्ग, कांदिवली
  • शिवडी मध्य विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, प्रबोधनकार ठाकरे क्रीडांगण, शिवडी


सामाजिक कार्यासाठी :

  • दी वरळी आंबेडकर नगर सार्वजनिक गणेशोत्सव, वरळी
  • दुर्वांकुर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सी विंग, दादोजी कोंडदेवी मार्ग,भायखळा
  • सार्वजनिक गणेशोत्सव समिती, सिद्धिविनायक सभागृह, कन्नमवार नगर १, विक्रोळी पूर्व
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा