अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

 Churchgate
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन
See all

आझाद मैदान - महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. मानधनवाढ आणि दिवाळी बोनससह अनेक प्रलंबित मागण्या यावेळी आंदोलनकर्त्यांनी मांडल्या. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीचे नेते एम ए.पाटील यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या :-

  • शासनाने गठित केलेली मानधनवाढ जाहीर करावी
  • महागाई निर्देशांकाला जोडलेली वार्षिक वाढ द्यावी
  • दिवाळीला 5 हजार रुपये बोनस मंजूर करावा
  • राज्यातील मानधनाच्या तुलनेत तातडीने भरीव वाढ द्यावी
  • सेविका, मदतनिसांच्या मानधनातील तफावत कमी करावी
  • इतर खात्यांची कामे महिला आणि बालविकास खात्याच्या परवानगीशिवाय देऊ नयेत
  • कामांना ओव्हरटाईमप्रमाणे तासांच्या हिशेबाने दुप्पट मानधन द्यावे
Loading Comments