Advertisement

अर्थमंत्री जेटली यांना कॅन्सर!

अर्थमंत्री अरूण जेटली नुकतेच दोन आठवड्यांची सुट्टी घेऊन अमेरिकेला रवाना झाले होते. वैयक्तिक कामासाठी न्यूयाॅर्कला जात असल्याचं अधिकृत पत्रकही जेटलींनी जारी केलं होतं. पण आता मात्र जेटली यांना कॅन्सरचं निदान झाल्याची माहिती समोर येत आहे.

अर्थमंत्री जेटली यांना कॅन्सर!
SHARES

अर्थमंत्री अरूण जेटली नुकतेच दोन आठवड्यांची सुट्टी घेऊन अमेरिकेला रवाना झाले होते. वैयक्तिक कामासाठी न्यूयाॅर्कला जात असल्याचं अधिकृत पत्रकही जेटलींनी जारी केलं होतं. पण आता मात्र जेटली यांना कॅन्सरचं निदान झाल्याची माहिती समोर येत आहे. जेटली यांनी मांडीमध्ये साॅफ्ट टिश्यू कॅन्सर झाली असून आता ते न्यूयाॅर्कमध्येच उपचार घेणार असल्याचंही समजतं आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला जेटली अनुपस्थितीत राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प कोण सादर करणार हा प्रश्नही निर्माण झाला आहे. 


मांडीमध्ये कॅन्सरची गाठ

मे २०१८ मध्ये जेटलींवर किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. असं असताना आता त्यांच्या मांडीमध्ये कॅन्सरची गाठ असल्याचं निदान झालं आहे. हा एका प्रकारचा ट्युमर असून हा शरिराच्या इतर भागात जलद पसरण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे शक्य तितक्या लवकर यावर शस्त्रक्रिया होण्याची गरज आहे. मात्र किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया झाल्यानं नव्या आणखी एका शस्त्रक्रियेमुळे त्यांच्या किडनीवर ताण येण्याची भिती डाॅक्टरांनी व्यक्त केल्याचीही माहिती समोर येत आहे. पण अद्यापपर्यंत त्यांच्या आजाराबाबत वा पुढील उपचाराबाबत सरकार वा जेटलींच्या कुठल्याही जवळच्या व्यक्तिंकडून अधिकृत माहिती मिळालेली नाही.


अर्थसंकल्प कोण करणार सादर? 

वैयक्तिक कारणांसाठी दोन आठवड्यांच्या सुट्टीवर जात असल्याचं सांगत जेटली अमेरिकेला गेले आहेत. पण आता कॅन्सरचं निदान झाल्यानं त्यांच्यावर तिथंच उपचार करण्यात येणार असून त्यांना डिस्चार्ज कधी मिळणार आणि ते भारतात कधी परतणार हा मोठा प्रश्न आहे. तर यंदाचा अर्थसंकल्प जेटली सादर करू शकणार नसल्याचीच  शक्यता अधिक आहे. 



हेही वाचा -

भाजपाच्या पदाधिकाऱ्याकडून प्राणघातक शस्त्रे जप्त, वस्तुविक्रीच्या नावाखाली शस्त्रविक्री

राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, शिवस्मारकाचं काम बंद



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा