Advertisement

सिनेमागृह सुरू करण्यास केंद्र सरकारने दिली परवानगी

यामुळे येत्या १५ आँक्टोंबरपासून सिनेमागृह ही ५० टक्के प्रक्षेकांच्या उपस्थितीत सुरू राहणार असल्याची घोषणा केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

सिनेमागृह सुरू करण्यास केंद्र सरकारने दिली परवानगी
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेले सिनेमागृह आता १५ आँक्टोंबरपासून  पुन्हा सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तशी घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी तशी घोषणा केल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. केंद्र सरकारने१ ऑक्टोबरपासून देशभरात अनलॉक-५ च्या गाईडलाईन्स लागू केल्या आहे. या गाईडलाईन्स दरम्यान केंद्र सरकार सिनेमागृहांना ५० टक्के उपस्थितीत १५ आँक्टोंबरपासून सिनेमागृह सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

ऑक्टोबर महिन्यापासून अनेक सण-उत्सवांना सुरुवात होते. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालय काही निर्बंध शिथील करु शकतं, असं बोललं जात असताना, बिहार निवडणुकाच्या पार्श्वभूमिवर केंद्रा सरकारने अनलॉक – ५ च्या गाईडलाईन्समधून सिनेमागृहांना आता परवानगी देण्यात आली आहे. मात्र परवानगी देताना केंद्र सरकारने सोशल डिस्टन्सिंग, मास्क, गर्दी टाळणे अशा काही अटी-शर्ती देखील घातल्या आहेत. यामुळे येत्या १५ आँक्टोंबरपासून सिनेमागृह ही ५० टक्के प्रक्षेकांच्या उपस्थितीत सुरू राहणार असल्याची घोषणा केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा