महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत (एमआयडीसी) ठाणे (thane) महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या काही भागांना पाणी पुरवले जाते. यात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा-मानपाडा आणि वागळे प्रभाग इत्यादी भागांचा समावेश आहे.
मात्र या भागातील पाणीपुरवठा देखभाल दुरुस्तीच्या कामानिमित्त बंद केला जाणार आहे. काटई नाका ते मुकुंद या वाहिनीवरील देखभालीच्या कामामुळे गुरुवार, 26 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12:00 ते शुक्रवार, 27 डिसेंबर 2024 रोजी रात्री 12:00 वाजेपर्यंत 24 तास पाणीपुरवठा बंद राहील.
दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. 26 आणि 31 मधील काही भाग वगळून) आणि ठाणे महापालिकेच्या (thane municipal corporation) कळवा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या भागात 24 तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद (water cut) राहणार आहे.
याशिवाय, वागळे प्रभाग समितीमधील रूपादेवी पाडा, किसननगर क्रमांक 2 आणि नेहरू नगर आणि मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत येणारे कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठाही (water supply) बंद केला जाणार आहे.
तसेच पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर 1 ते 2 दिवस पाणीपुरवठा कमी दाबाने होईल, असा सल्ला पालिकेने नागरिकांना दिला आहे.
दरम्यान, कपातीच्या काळात नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून ठाणे महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
हेही वाचा