Advertisement

चर्चगेट स्थानकावरही स्ट्रक्चरल ऑडिटची वेळ!

पश्चिम रेल्वेनं या संपूर्ण इमारतीचं त्रिसदस्यीय समितीमार्फत स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणं त्रिसदस्यीय समितीद्वारा या घटनेची खातेअंतर्गत चौकशी देखील करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

चर्चगेट स्थानकावरही स्ट्रक्चरल ऑडिटची वेळ!
SHARES

वायू चक्रीवादळामुळं मुंबईतील चर्चेगेट स्थानक पूर्व इथं उभे असेलेल्या मधुकर आप्पा नार्वेकर (६२) त्यांच्यावर सिमेंटची शीट कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेचं गाभीर्य लक्षात घेत पश्चिम रेल्वेनं या संपूर्ण इमारतीचं त्रिसदस्यीय समितीमार्फत स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणं त्रिसदस्यीय समितीद्वारा या घटनेची खातेअंतर्गत चौकशी देखील करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

अॅल्युमिनियम होर्डिंग

चर्चगेट स्थानकाच्या इमारतीवरील ८१ फूट उंच महात्मा गांधी यांच्या छायाचित्राच्या ५ चौकोनी अॅल्युमिनियम शीट्स वादळी वाऱ्यानं बुधवारी दुपारी १२.२० वाजताच्या सुमारास कोसळल्या. यावेळी दहिसर इथं राहणारे मधुकर नार्वेकर उभे होते. शीट त्यांच्या डोक्यात कोसळ्यानं यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यावेळी रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाची अपघाती मृत्यू नोंद केली.

त्रिसदस्यीय समिती

या इमारतीचं संपूर्ण स्ट्रक्चरल ऑडिट त्रिसदस्यीय समितीमार्फत करण्यात येणार आहे. तसंच, हे चित्र कायम ठेवायचं की काढायचं याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची त्रिसदस्यीय समितीमार्फत खातेअंतर्गत चौकशीही करण्यात येणार आहे.

१९४० सालचं चित्र

चर्चगेट स्थानकाच्या इमारतीवर ऑक्टोबर २०१७ रोजी प्रसिद्ध ब्राझिलीयन चित्रकार इडयुरो कोब्रा यांनी तयार केलेलं महात्मा गांधी रेल्वेतून उतरत असल्याचं १९४० सालचं चित्र बसविण्यात आलं होतं. स्ट्रीट आर्ट इंडिया फाऊंडेशन या एनजीओ आणि एशियन पेण्ट्सच्या सहकार्यातून चर्चगेट इमारतीच्या सुशोभीकरणाचं हे रंगकाम करण्यात आलं होतं.



हेही वाचा -

सुरक्षेसाठी पूल बंद केले असले, तरी त्वरित पर्यायी व्यवस्था करा - राहुल शेवाळे

मालाडमध्ये झाडाची फांदी कोसळून ३८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा