Advertisement

मालाडमध्ये झाडाची फांदी कोसळून ३८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

मुंबईतील मालाड परिसरात झाडाची फांदी कोसळून एका ३८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. शैलेश मोहनलाल राठोड असं या मृत व्यक्तीचं नावं आहे.

मालाडमध्ये झाडाची फांदी कोसळून ३८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
SHARES

मुंबईतील मालाड परिसरात झाडाची फांदी कोसळून एका ३८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. शैलेश मोहनलाल राठोड असं या मृत व्यक्तीचं नावं असून, शुक्रवारी सकाळी ६.२९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेनंतर शैलेश यांना कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

शताब्दी रुग्णालयात उपचार

शैलेश राठोड हे मालाड येथील नारीयालवाला कॉलनीमध्ये राहत होते. शैलेश हे मंदिरात पुजा करुन घरी परतत असताना त्यांच्यावर अचानक झाडाची फांदी कोसळली. झाडाची फांदी कोसळल्यानं ते जखमी झाले होते. त्यावेळी त्यांना तातडीनं शताब्दी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला

फांद्यांची छाटणी

पावसाळ्यापूर्वी पालिकेकडून झाडांच्या वाढलेल्या फांद्यांची छाटणी करण्यात येते. परंतु, काही झाडांची वेळीच छाटणी न करण्यात आल्यानं असे प्रकार घडतात. दरम्यान, या घटनेनंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत झाडाच्या फांद्या छाटण्याचं काम सूरु केलं.



हेही वाचा -

सुरक्षेसाठी पूल बंद केले असले, तरी त्वरित पर्यायी व्यवस्था करा - राहुल शेवाळे

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर बेस्टची किंग्ज सर्कल परिसरात मोफत सेवा



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा