Advertisement

सुरक्षेसाठी पूल बंद केले असले, तरी त्वरित पर्यायी व्यवस्था करा - राहुल शेवाळे

मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी पूल बंद केले असले, तरी रहिवाशांसाठी त्वरित पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

सुरक्षेसाठी पूल बंद केले असले, तरी त्वरित पर्यायी व्यवस्था करा - राहुल शेवाळे
SHARES

मुंबईसह उपनगरातील अनेक पूल बंद करण्यात आले आहेत. कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यापूर्वीच मुंबई महानगरपालिका, रेल्वे प्रशासन आणि मुंबई पोर्ट ट्रस्टनं अनेक पादचारी पूल बंद केल्यानं प्रवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसंत, पावसाळा सुरू झाला असून या त्रासात आणखी भर पडली आहे. त्यामुळं मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी पूल बंद केले असले, तरी रहिवाशांसाठी त्वरित पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

४ महिन्यांपासून बंद

हार्बर रेल्वे मार्गावरील वडाळा पूर्व रेल्वे स्थानकाबाहेरील २ पादचारी पूल रेल्वे आणि मुंबई पोर्ट ट्रस्टनं धोकादायक ठरवून मागील ४ महिन्यांपासून बंद केले आहेत. त्यामुळं या परिसरातील रहिवाशांची आणि प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रवाशांची होणारी ही गैर सोय लक्षात घेऊन खासदार राहुल शेवाळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह या पुलांची पाहणी केली. तसंच, यामधील एका पादचारी पुलाचं संरचनात्मक परीक्षण तातडीनं करून तो खुला करण्याची मागणी केली आहे.

पादचारी पूल बंद

किंग्ज सर्कल रेल्वे स्थानकाच्या बाहेरील पादचारी पूल बंद असल्यानं रहिवाशांना रस्ता ओलांडण्यासाठी माटुंगा पुलाखाली व्यवस्था करावी, दादर रेल्वे स्थानकावरील फुल मार्केट पुलावर प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता या पुलाचे रुंदीकरण करावे अशी मागणीही शेवाळे यांनी रेल्वे प्रशासनाकडं केली आहे.



हेही वाचा -

रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी पालिकेचं मोबाईल अॅप

वांद्र्यात समुद्रात बुडून एका तरुणाचा मृत्यू



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा