यंदा मान्सूनने वेळेआधीच एन्ट्री केली आहे. मुंबईसह (mumbai) राज्यभरात पावसाच्या सरी कोसळतच आहेत. या मुसळधार पावसामुळे (heavy rain) सर्वसामान्य माणसांसह प्राण्यांचीही 'गैरसोय' झाली आहे.
अशातच मुंबईच्या बीकेसी (bkc) परिसरातून एक भीतीदायक घटना समोर आली आहे. बीकेसीतील सेबी भवनात अजगराची पिल्ले सापडली आहेत. शनिवार ते बुधवार या पाच दिवसांत एक-दोन नव्हे, तर अजगराची तब्बल 12 पिल्ले मिळाली आहेत.
पावसाळा सुरू झाल्यामुळे सापांचा मानवी वस्तीमध्ये वावर वाढला आहे. बीकेसी परिसरात शनिवार ते बुधवार या पाच दिवसांत अजगराची 12 पिल्ले सापडली, ज्यापैकी एका पिल्लाचा गाडीखाली येऊन मृत्यू झाला.
वापरा संस्थेला मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास बीकेसी सेबी भवनात अजगराची पिल्ले (python) रस्त्यावर फिरत असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच सर्पमित्र आणि वन विभागाच्या मदतीने बचावकार्य करण्यात आले.
दरम्यान, बीकेसी परिसरात अजगरांची पिल्ले (Baby python) सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वापरा संस्थेला मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास बीकेसी सेबी भवनात अजगराची पिल्ले रस्त्यावर फिरत असल्याचा फोन आला.
संस्थेने तातडीने वन विभागाचे राउंड अधिकारी रोशन शिंदे व मुंबई रेंज कंट्रोल यांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळाल्यावर सर्पमित्र अतूल कांबळे व माहीम पोलीस वसाहतीमध्ये राहणारे सर्पमित्र पोलीस कॉन्स्टेबल सचीन मोरे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पकडलेल्या अजगरांच्या पिल्लांना सुरक्षित ठिकाणी हलवले.
गेल्या शनिवारी पहिला साप आढळल्याचा कॉल आला होता. त्यावेळी सदर सेबी भवनातील सुरक्षा रक्षकांना आधी चार अजगरचे पिल्ले मिळाली होती. त्यांनी ती मिठी नदीच्या आवारात असलेल्या खार-फुटीच्या खाडीत सोडली.
शनिवारी सापडलेली चार पिल्ले सेबी भवनातील सुरक्षा रक्षकांनी मिठी नदीच्या खाडीत सोडली होती. सर्पमित्र मंगळवारी बीकेसी येथे गेले असता पहिले पिल्लू हे सेबी भवन बाहेर पादचारी मार्गावर मिळाले. त्याला रेसक्यू करून सर्प मित्राने आजू-बाजूचा परिसर सर्वे केला. त्यादरम्यान रस्त्यावर अजगराचे एक पिलू गाडी खाली आल्यामुळे मृत अवस्थेत दिसले.
हेही वाचा