SHARE

लोअर परळ - प्रकाश कॉटन मिलच्या क्रॉस लेन येथील दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्यानाचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले. शिवसेना नगरसेविका किशोरी पेडणेकर यांच्या प्रयत्नातून हे उद्यान उभारण्यात आले. या उद्यानामुळे दैनंदिन कामातून वेळ काढून मोकळा श्वास घेण्यासाठी जागा उपलब्ध झाली, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. यावेळी मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, आमदार सुनील शिंदे आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या