Advertisement

नवी मुंबईत अाज बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा


नवी मुंबईत अाज बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा
SHARES

नवी मुंबईत शनिवारी ‘बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.


राज्यभर मेळावे

पुणे जिल्ह्यातील हडपसर या ठिकाणी १६ जून २०१८ रोजी पहिला बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा घेण्यात आला. पहिल्या मेळाव्याच्या यशानंतर राज्यभरातून मेळावे घेण्याची मागणी होत आहे. त्यानुसार ८ सप्टेंबर रोजी नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये हा मेळावा होणार आहे. ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने इच्छुक उमेदवारांची नोंदणी करण्यात आली.


१० हजारांना रोजगाराची संधी

या मेळाव्यातून सुमारे दहा हजार मुलामुलींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. यासाठी नवी मुंबई परिसरातील सुमारे ४२७ कंपन्यांनी रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याची तयारी दर्शविली आहे. मुला-मुलींना पदवीनुसार विविध कंपन्यांमध्ये मुलाखतीची संधी दिली जाणार आहे. आयटीआय, अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन, बँकिंग आदी शाखांतील मुलांना नोकरीची संधी मिळणार आहे. राज्य शासनाचा उद्योग विभाग तसेच सीआयआय या उद्योग संघटनेचा या उपक्रमात प्रमुख सहभाग आहे.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा