Advertisement

स्वच्छ रेल्वे स्टेशनच्या यादीत वांद्रे टॉप 10 मध्ये

सोमवारी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी स्वच्छ रेल्वे स्थानकांचा अहवाल जाहीर केला. ज्यामध्ये मुंबईतील सीएसएमटी, ठाणे, वांद्रे, मुंबई सेंट्रल, दादर, कल्याण, पनवेल या स्थनाकांचा समावेश आहे.

स्वच्छ रेल्वे स्टेशनच्या यादीत वांद्रे टॉप 10 मध्ये
SHARES

भारतातील स्वच्छ रेल्वे स्थानकांमध्ये मुंबईतील वांद्रे स्थानकाने बाजी मारली आहे. ‘ए-1’श्रेणीमध्ये वांद्रे स्थानक सातव्या क्रमांकावर असून देशातील टॉप दहा स्थानकांत त्याला स्थान मिळालं आहे. तर या श्रेणीत सीएसएमटी आणि दादर स्थानकांनीही सुधारणा केली असून या यादीत राज्यातील 36 स्थानकांना स्थान मिळालं आहे.  

सोमवारी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी स्वच्छ रेल्वे स्थानकांचा अहवाल जाहीर केला. ज्यामध्ये मुंबईतील सीएसएमटी, ठाणे, वांद्रे, मुंबई सेंट्रल, दादर, कल्याण, पनवेल या स्थनाकांचा समावेश आहे. 


'ही' स्थानकं कितव्या क्रमांकावर

टॉप 10 मध्ये वांद्रे स्थानकाने 7 वा क्रमांक पटकावला आहे. तर मागच्या वर्षी 63 व्या स्थानावर असलेल्या कल्याण स्थानकाची 71 व्या स्थानावर घसरण झाली आहे. सीएसटीएम 30 व्या स्थानावर, लोकमान्य टिळक टर्मिनस 35 व्या तर मुंबई सेंट्रल 40 व्या स्थानावर आहे. या यादीत ठाणे स्थानक 57 व्या क्रमांकावर आहे.


या आधारावर सर्वेक्षण

या सर्वेक्षणासाठी रेल्वे स्थानकावरील पादचारी पूल, तिकीट खिडकीचा परिसर, रेल्वे रूळ, मुख्य प्लॅटफॉर्म, प्रतीक्षागृह, पार्किंग परिसरातील स्वछता, प्रवेश दारावरील व्यवस्था, प्रवाशांकडून नोंदवलेलं मत, या सर्व बाबी तपासण्यात आल्यानंतर त्या आधारावर हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.
देशातील एकूण 332 रेल्वे स्थानाकाची निवड अ श्रेणीत करण्यात आली असून त्यामध्ये महाराष्ट्रातील 36 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. तर मुंबईतील 8 स्थानकांचा समावेश आहे.


हेही वाचा -

देशात मुंबई राहण्यासाठी सर्वोत्तम!

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा