Advertisement

BDD Chawl Fire: २ महिला जखमी, ७०-८०% भाजल्यानं प्रकृती गंभीर

दोघांना अनुक्रमे कस्तुरबा हॉस्पिटल आणि नायर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

BDD Chawl Fire: २ महिला जखमी, ७०-८०% भाजल्यानं प्रकृती गंभीर
(Representational Image)
SHARES

मुंबईतील बीडीडी चाळमधील एका घराला सोमवारी, ४ एप्रिल रोजी संध्याकाळी भीषण आग लागली होती, यात दोन महिला जखमी झाल्या.

वरळीतील जांबोरी मैदानाजवळील बीडीडी चाळ क्रमांक ५५ इथं दुपारी ४.२४ वाजता एलपीजी सिलिंडरला गळती लागल्यानं ही घटना घडली. काही वेळातच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि ४.४२ पर्यंत आग विझवण्यात यश आले. मात्र, सुमारे दीड तासात आग आटोक्यात आली.

सुनीता वंजारी (४७) आणि निशा पाटाकर (४३) या दोघांना अनुक्रमे कस्तुरबा हॉस्पिटल आणि नायर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

७० ते ८० टक्के भाजलेल्या सुनीता वंजारी (४७) यांची प्रकृती गंभीर आहे. तिला नागरीक संचालित कस्तुरबा रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.

दुसरी रुग्ण निशा पाटकर (४३) हिला बीवायएल नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाटाकर यांना धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होणे, चक्कर येणे आणि छातीत दुखणे असे त्रास होत आहेत. तिची प्रकृती आता स्थिर असल्याचं एका अधिकाऱ्यानं सांगितलं.

दरम्यान, त्याच दिवशी पालघरमधील वाडा तालुक्यातील बिलोशी गावात एका घराला आग लागून घरातील मालमत्तेचे आणि संसारोपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवानं यात कोणीही जखमी झाले नाही. याशिवाय शॉर्टसर्किटमुळे लागलेली ही आग अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभरात आटोक्यात आणल्याचं समोर आलं आहे.



हेही वाचा

पिण्याच्या पाण्याबाबत पालिकेनं घेतला मोठा निर्णय, वाचा सविस्तर

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा