घाटकोपर - एन वॉर्डमधील पालिका कार्यालयात मंगळवारी लोकशाही दिन उपक्रम राबवण्यात आला. मात्र यावेळी अनधिकृत बांधकामांच्या तक्रारींचे प्रमाण अधिक होते. या तक्रारी सोडवण्याबाबत मात्र पालिका अधिकाऱ्यांमध्ये उदासीनता दिसून येत होती.
घाटकोपर पूर्व येथील एन वॉर्डमधील पालिका कार्यालयात मंगळवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात आला होता. यावेळी एकूण ११ तक्रारी आल्या होत्या. त्यात अनधिकृत बांधकामासंबंधी तक्रारींचे प्रमाण जास्त होते. पण अनधिकृत बांधकामांच्या तक्रारी सोडविण्याबाबत अधिकाऱ्यांमध्ये उदासीनता दिसून आली. या तक्रारींबाबत विचारणा केली असता अधिक माहिती सांगण्यास पालिका अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली.