Advertisement

मिठायांवर बेस्ट बिफोरची तारीख बंधनकारक

ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं मिठाई किती काळ खाण्यायोग्य आहे, याची तारीख सर्व मिठाई विक्रेत्यांनी मिठाईच्या खोक्यावर किंवा पुडक्यावर नोंदवणे राज्य सरकारने बंधनकारक केले होते.

मिठायांवर बेस्ट बिफोरची तारीख बंधनकारक
SHARES

बाजारात तयार मिठाया तसंच दुग्धजन्य पदार्थांना प्रचंड मागणी असते. या पार्श्वभूमीवर, ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं मिठाई किती काळ खाण्यायोग्य आहे, याची तारीख सर्व मिठाई विक्रेत्यांनी मिठाईच्या खोक्यावर किंवा पुडक्यावर नोंदवणे राज्य सरकारने बंधनकारक केले होते. दुसरीकडे, मिठाईचा आरोग्याशी थेट संबंध असल्याने सामान्य मुंबईकरही याबाबत सजगपणे होत आहेत.

बड्या विक्रेत्यांनी मिठाईसमोर मुदतीची माहिती नोंदवण्यास प्रारंभ केला आहे. मात्र लहान दुकानांमध्ये या नियमांना बगल दिली जात असल्याचे दिसते.

सणासुदीच्या दिवसांमध्ये मुंबई महानगर प्रदेशासह राज्यभरात खवा, मावा यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. मागणी मोठी असल्याने अनेकदा काही दिवस उलटलेल्या मिठायाही ग्राहकांच्या माथी मारल्या जातात. त्यामुळं सर्वसामान्यांना आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागतं.

या पार्श्वभूमीवर, आदेश अन्न व औषध प्रशासनाने जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मिठाई व इतर खाद्य पदार्थांच्या उत्पादकांसोबत बैठक घ्यावी, त्यांना योग्य ते निर्देश द्यावेत.

मिठाई व इतर पदार्थांवर ते तयार झाले त्या दिवसाची आणि खाण्यास योग्य असल्याची अंतिम तारीख यांनी नोंद करणं आवश्यक आहे, याबाबत जनजागृती करावी. त्याचबरोबर दुध व दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ तपासणी वाढवावी आणि त्याचा सविस्तर अहवाल सादर करण्यात यावा, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

सरसकट सर्वच मिठाई दुकानदारांना या नियमांचे पालन करण्याची सक्ती करावी तसेच नियमांचे पालन न करणाऱ्या मिठाई दुकानदारांवर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी सामान्य नागरिक करत आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा