SHARE

बेस्ट बसवाहकाच्या प्रामाणिकपणामुळे एका प्रवाशाला त्यांचे 2 लाख रुपये पुन्हा मिळाले आहेत. बसवाहकाच्या या प्रमाणिकपणामुळे बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी घाटकोपर आगारास भेट देत गोकुळ राठोड यांचा सत्कार केला.


अशी केली बॅग परत

घाटकोपर पूर्व आगारातून सुटलेल्या बस क्रमांक 406 मधून प्रवासी केशव शिरसाठ प्रवास करत होते. पण जेव्हा ते बसमधून उतरत होते, तेव्हा शिरसाठ यांनी पैशाने भरलेली बॅग आणि छत्री घ्यायलाच विसरले.

प्रवास संपल्यानंतर अचानक बसवाहक राठोड यांना एक बॅग आणि छत्री मिळाली. त्या दिवशी त्यांच्या बसमध्ये केशव शिरसाठ हे प्रवाशी प्रवास करत होते. परंतु प्रवास संपल्यावर ते आपली बॅग आणि छत्री बसमधेच विसरून गेले. ही गोष्ट बसवाहक यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ती बॅग आगारात जमा केली. त्यांच्या या प्रमाणिकपणामुळे बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी घाटकोपर आगारास भेट देऊन गोकुळ राठोड यांचा सत्कार केला. तसेच प्रवासी केशव शिरसाठ यांची बॅग देखील त्यांना परत करण्यात आली. यावेळी एन वॉर्ड प्रभाग समिती अध्यक्ष सुरेश पाटील, घाटकोपर आगार व्यवस्थापक आणि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. बेस्टचा प्रवास सुरक्षित प्रवास हे पुंन्हा एकदा बेस्ट कर्मचारी गोकुळ राठोड यांनी आपल्या प्रमाणिकपणाने सिद्ध करून दाखवले आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या